Marketing Federation : पणन महासंघामार्फत कडधान्य, तेलबियांची खरेदी

SOYABIN Marketing Federation : पणन महासंघामार्फत कडधान्य, तेलबियांची खरेदी

नांदेड| हंगाम 2025-26 मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार राज्यात नाफेड व NCCF च्यावतीने पणन महासंघामार्फत राज्यात कडधान्य व तेलबियांची (मुंग,उडीद, सोयाबीन व तुर ) खरेदी करण्यात येणार आहे.

आधारभूत दराने खरेदी करण्याकरीता ई-पिक पाहणी असलेला 7/12 उतारा आवश्यक आहे. तसेच सदर खरेदी प्रक्रिया ही शेतकऱ्यांच्या हितासाठी पारदर्शक, कार्यक्षम व संपूर्णपणे ऑनलाईन प्रणालीव्दारे पार पाडली जाणार आहे.

केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घेण्याकरीता महाराष्ट्र्रातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची ई-पिक पाहणी शासनाने दिलेल्या कालावधीत पुर्ण करावी, असे आवाहन पणन महासंघामार्फत करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top