क्राईमनांदेड

Collector Actions : जिल्हाधिकाऱ्यांची थेट मैदानात उतरून धडक कारवाई

बिलोली /नांदेड, गोविंद मुंडकर | नांदेड जिल्ह्यात अवैध वाहतूक आणि नियमबाह्य वाहनांवर कारवाईचा बडगा उगारत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी बिलोली येथे थेट धडक कारवाई केली. विनानंबर व विनापरवाना सुरू असलेली चार हायवा वाहने पकडून तात्काळ कारवाई करण्यात आल्याने अवैध वाहतूकदारांत खळबळ उडाली आहे.

बिलोली परिसरात तपासणीदरम्यान एमएच 24 बीडब्लू 7727, एमएच 24 बीडब्लू 7227, एमएच 24 सीई 7227 आणि एमएच 20 जीएस 0793 ही हायवा वाहने अनधिकृतरीत्या वाहतूक करत असल्याचे आढळून आले. या सर्व वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून प्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाला पाचारण करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

या कारवाईदरम्यान जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्पष्ट शब्दांत इशारा देत सांगितले की, विनानंबर, बनावट नंबर किंवा अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर यापुढे कोणतीही तडजोड केली जाणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई अटळ आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या या अचानक आणि थेट कारवाईमुळे प्रशासनाच्या भूमिकेचे कौतुक होत असून, अवैध वाहतूक करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button