HomeकृषीLoans bhuvikas bank : नांदेड जिल्ह्यातील भू-विकास बँकेच्या 5,106 शेतकऱ्यांचे कर्ज अधिकृतपणे...

Loans bhuvikas bank : नांदेड जिल्ह्यातील भू-विकास बँकेच्या 5,106 शेतकऱ्यांचे कर्ज अधिकृतपणे माफ

नांदेड | नांदेड जिल्ह्यातील भू-विकास बँकेकडून कर्ज घेतलेल्या एकूण 5 हजार 106 शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्यात आले असून, त्यांच्या 7/12 उताऱ्यावरील कर्जबोजा कमी करण्याबाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी 2 फेब्रुवारी रोजी परिपत्रक जारी केले आहे.

या परिपत्रकानुसार जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना तालुकानिहाय थकबाकीदार शेतकऱ्यांची यादी देण्यात येणार असून, मंडळस्तरावर विशेष कॅम्प आयोजित करून 7/12 वरील भू-विकास बँकेच्या कर्जबोजाची नोंद कमी करण्याचे व त्याचे प्रमाणपत्र देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, नांदेड जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक (भू-विकास बँक) नांदेड या बँकेची 8 मार्च 2025 रोजी नोंदणी रद्द करण्यात आली आहे. त्याआधीच राज्य शासनाच्या 9 नोव्हेंबर 2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण विकास बँक मर्यादित, मुंबई (शिखर भू-विकास बँक) तसेच जिल्हा भू-विकास बँकांकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्यात आले होते.

या पार्श्वभूमीवर, भू-तारण बँक, भू-विकास बँक व महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण विकास बँक मर्यादित, मुंबई या बँकांचे सभासद असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या 7/12 उताऱ्यावर कर्जबोजा कमी झाल्याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी शेतकऱ्यांनी तलाठी, तहसील कार्यालय किंवा तालुका सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन शाहुराज हिरे, परिरक्षक – नांदेड जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक तसेच जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नांदेड यांनी केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments