Loans bhuvikas bank : नांदेड जिल्ह्यातील भू-विकास बँकेच्या 5,106 शेतकऱ्यांचे कर्ज अधिकृतपणे माफ
नांदेड | नांदेड जिल्ह्यातील भू-विकास बँकेकडून कर्ज घेतलेल्या एकूण 5 हजार 106 शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्यात आले असून, त्यांच्या 7/12 उताऱ्यावरील कर्जबोजा कमी करण्याबाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी 2 फेब्रुवारी रोजी परिपत्रक जारी केले आहे.
या परिपत्रकानुसार जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना तालुकानिहाय थकबाकीदार शेतकऱ्यांची यादी देण्यात येणार असून, मंडळस्तरावर विशेष कॅम्प आयोजित करून 7/12 वरील भू-विकास बँकेच्या कर्जबोजाची नोंद कमी करण्याचे व त्याचे प्रमाणपत्र देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, नांदेड जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक (भू-विकास बँक) नांदेड या बँकेची 8 मार्च 2025 रोजी नोंदणी रद्द करण्यात आली आहे. त्याआधीच राज्य शासनाच्या 9 नोव्हेंबर 2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण विकास बँक मर्यादित, मुंबई (शिखर भू-विका...
