नांदेड| अवैधरित्या नदी पात्रातुन वाळू उपसा करून वाळूची वाहतुक करणाऱ्यावर दोन ट्रॅक्टर व एक हायवा वर स्थानिक गुन्हे शाखा नांदेड, पोलीस स्टेशन देगलुर, पोलीस स्टेशन लिंबगाव यांनी संयुक्त कार्यवाही करत एकूण 23 लक्ष 61 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.


नांदेड जिल्हयामध्ये वाळु माफीयाकडून अवैध मार्गाने वाळू उपसा व वाहतुक करून शासनाचा लाखो रूपयाचा महसुल बुडविला जात असल्याने अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी उदय खखंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांना अवैध वाळू उपसा व वाहतुक करणा-यांवर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दिनांक 01 जुलै 2025 रोजी उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांनी मिळालेल्या गोपनिय माहीतीवरुन स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड येथील पोलीस अंमलदार यांना कार्यवाही करण्याचे आदेशीत केले.


त्यावरून पोना.विठ्ठल शेळके, पोकों संजय राठोड व पोलीस स्टेशन देगलुर येथील टिम असे पोलीस स्टेशन देगलुर हद्दीत नरंगल ते खानापुर रोडवर तसेच देगलूर रोडवर अवैध रेती उपसा करून रेतीची वाहतुक करणारे आर.टी.ओ. पासीग नसलेले दोन ट्रॅक्टर चालक व मालक यांचेवरूध्द कार्यवाही करून 6 लक्ष 25 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करून पोलीस स्टेशन देगलूर ठाण्यात विरभद्र चंद्रकांत बैलकर वय 19 वर्ष, व्यवसाय चालक रा.तमलुर ता. देगलूर, मन्मथ परवते रा. खानापुर ता. देगलुर. अदिनाथ जगन्नाथ दशरथे वय 24 वर्ष, व्यवसाय चालक, रा. दशरथे परळी ता. वसमत जिल्हा हिंगोली, JHON DEERE कंपनिचा विना नंबरचा ट्रॅक्टर व ट्रॉली चे.नं. 1VY5310EPNA024802 चा चालक व मालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.


तसेच पोहेको गणेश लोसरवार, पोलीस स्टेशन लिबगाव येथील टिम यांनी पोलीस स्टेशन लिबगाव हद्दीतील सायाळ ते वाधी जाणारे रोडवर अवैद्य रेती उपसा करून रेतीची वाहतूक करणारा हायवा क्रमांक एम.एच 12 एल.टी. 1197 चा चालकावर कार्यवाही करून 17 लक्ष 36 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करून पोलीस स्टेशन लिबगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे एकुण 03 कार्यवाहीमध्ये 23 लक्ष 61 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कामगिरी करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षकनांदेड यांनी कौतुक केले.
