
नांदेड | दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नांदेड जिल्हा भावसार समाज कार्यकारणीच्या वतीने वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करून यात गुणवंत विद्यार्थ्यांचा व कन्यारत्न प्राप्त मातापित्यांचा सत्कार सोहळा भाऊसाहेब रंगार गल्ली नांदेड येथील विठ्ठल मंदिर येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अतिरीक्त उपजिल्हाधिकारी सुनील महेंद्रकर तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.लक्ष्मीकांत पेंडकर (बालरोगतज्ञ), नांदेड जिल्हा भावसार समाज कार्यकारणी अध्यक्ष गंगाधरराव बडवणे, कार्याध्यक्ष गिरीश बुलबुले, सचिव सुरेश गोजे, भावसार समाज प्रगती महिला मंडळ अध्यक्षा विनाताई माळवतकर, विश्वस्त गोविंदराव मेहेत्रे व्यासपीठावर उपस्थित होते .


नांदेड जिल्ह्यातील भावसार समाजातील शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील दहावी बारावी पदव्युत्तर व पदवी पदविका तसेच सीईटी नीट जेईई व तत्सम शैक्षणिक क्षेत्रात गुणवंत ठरलेल्या व समाजातील कन्यारत्न प्राप्त झालेल्या मातापित्यांचा मान्यवरांच्या हस्ते हिंगलाज मातेची प्रतिमा व प्रशस्तीपत्र तसेच अव्वल असणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रकमेचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव सुरेश गोजे यांनी केले .

यानंतर सर्वसाधारण सभी दरम्यान डिसेंबर महिन्यात २०२४ मध्ये उपवधू वर परिचय मेळावा घेण्याचा प्रस्ताव सभागृहात ठेवण्यात आला. लवकरच एक संयुक्त बैठक घेऊन उपवधू-वर परिचय मेळाव्याची कार्यकारिणी निवडणे व मेळावा रूपरेषा, ठरविण्यात येणार आहे .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ .विजय कातकाडे यांनी तर आभार राजेश सुत्रावे यांनी मानले .





