नांदेड| दारासिंग लच्छमाजों राठोड वय ५२ वर्ष, पोलीस अंमलदार गुन्हे शोध पथक पोलीस ठाणे विमानतळ नांदेड, यांनी 27 रोजी सांगवी आसना ब्रिजच्या जवळ, नांदेड पोलीस ठाणे विमानतळ नांदेड येथील पोलीस अधिकारी/अंमलदार यांनी आरोपी शेख मोसिन शेख माईन रा. जवळा बाजार, ता. औंढा, जि. हिंगोली (वाहनाचा चालक) मुद्यसिर कुरेशी सलीम कुरेशी रा. जवळा बाजार, ता. औंढा, जि. हिंगोली (वाहनाचा मालक) यांना ताब्यात घेऊन एकै बोलेरो पिकअप वाहन क्रमांक MH38E3193 कि.अं.2,50,000/- कत्तलीसाठी जाणारे एकूण तिन गोवंश जातीचे बैल जनावरे असे एकूण 1,35,000/- असा एकूण 3,85,000/-रुपयाचा माल जप्तीची कार्यवाही केली आहे.
अबिनाशकुमार, पोलीस अधिक्षक नांदेड, खंडेराव धरणे, अप्पर पोलीस अधिक्षक भोकर, सुरज गुरव, अप्पर पोलीस अधिक्षक नांदेड, श्रीमती किरीतीका सि.एम, सहायक पोलीस अधिक्षक, उप विभाग, नांदेड (शहर) यांचे मार्गदर्शनाखाली गणेश चव्हाण, पोलीस निरीक्षक, पो.स्टे. विमातनळ, नांदेड 2) बालाजी मस्के, पो उप निरीक्षक, पो.स्टे. विमातनळ, नांदेड, पोलीस अंमलदार दारासिंग राठोड, पोहेकों, पोहेकों. बंडू जाधव, पोकों. ज्ञानेश्वर भिसे, पोकों. कुरुकवाड, चालक ASI श्री सिद्योकी, सर्व नेमणुक पोलीस ठाणे विमातनळ, नांदेड यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी परिश्रम घेतले.
अविनाश कुमार, पोलीस अधिक्षक, नांदेड यांनी ऑपरेशन फ्लूश आऊट दरम्यान अवैद्यरित्या जनावराची चोरटी वाहतुक करणारे इसम व वाहनावर कार्यवाही करण्याबाबत सर्व पो.स्टे. प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते. त्यावरून दिनांक २७/१०/२०२४ रोजी सकाळी ०७.५५ वाजता आसना ब्रिजच्या जवळ सांगवी नांदेड येथे रोडवर अर्धापुर कडून एक वाहन क्रमांक MH38E3193 बोलेरो पिकअप मध्ये गोवंश जातीचे वेल जनावराची चोरटी वाहतुक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
यावरून नमुद पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी दिनांक 27/10/2024 रोजी 07.55 वाजता आसना ब्रिज येथे रोडवर थांबुन दोन पंचाचे समक्ष सदर वाहणाची पाहणी तपासणी केली असता त्यात एकूण तिन गोवंश जातीचे बैल किंमती 1,35,000/-रुपयाचे मिळून आल्याने सदर वाहनाचा व गोवंश जनावरे बैलाचा सविस्तर पंचनामा करुन वाहनासह बैल असे एकूण 3,85,000/-रुपयाचा माल जप्त करुन यातील नमुद आरोपीवर गुरनं व कलम 438/2024 कलम ५ (A), ५(B), ९,३, प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियम-१९६० व कलम ११(१), (d), ११(१) (E),११ (१), (F) महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम-१९७६ अनुसार कार्यवाही करण्यात आली आहे. हि कार्यवाही केल्याबद्दल पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.