
नवीन नांदेड l भारतीय जनता पार्टी ग्रामीण नांदेड दक्षिण युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पदी दत्ता गोविंदराव पाटील जाधव वांगीकर यांची नियुक्ती दक्षिण अध्यक्ष विश्वाभंर पाटील शिंदे यांनी एका नियुक्ती पत्राव्दारे केली आहे.


नांदेड दक्षिण तालुक्यातील वांगी या गावाचे ते युवक सरपंच म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे भाजपा पक्षात व सामाजिक, राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील अग्रेसर राहुन व ,13 ते 14 वर्षांपासून आजपर्यंत ते पुरोगामी चळवळी मध्ये काम करतात मराठा सेवा संघ , संभाजी ब्रिगेड ह्या संघटनेत त्यांनी काम केले आहे आज ते पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी सुद्धा काम करत आहे,त्यांनी जिल्हायात वेळोवेळी शेतकऱ्यांना ,विध्यार्थ्यांना गरजू रुग्णांना त्यांचे काम करून मदत केली आहे,आज घडीला ते वांगी ता नांदेड येथील सरपंच पदावर विराजमान आहेत जिल्हाभरात त्यांची ओळख युवा सरपंच म्हणून आहे ते नांदेड जिल्ह्यात सर्वात तरुण सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आले होते.

त्यांच्या ह्या निवडीबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद चव्हाण , महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा खा.अशोकराव चव्हाण , राज्यसभा खा.अजित गोपछडे ,भाजपा वैद्यकीय आघाडी प्रदेश संयोजक सचिन पाटील उमरेकर,भाजपा जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे,महानगर जिल्हाध्यक्ष अमरनाथ राजूरकर,भाजपा तालुकाध्यक्ष विश्वांभर पाटील शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे व जिल्ह्यातील आणि तालुक्यातील सर्व वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते व नांदेड दक्षिण मधील सर्व जनतेचे निवडीबद्दल आभार व्यक्त केले.


आणि इथून पुढे सुद्धा अजून जोमाने कामाला लागून लहान थोरांच्या प्रत्येक अडचणी सोडवण्याचे व जनतेचे प्रत्येक काम जोमाने करणार असल्याचे सांगितले .
निवडीबद्दल मित्र मंडळ यांनी अभिनंदन केले आहे.




