नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन हदतील चार गावातील संरपच व सदस्यांची निवड…NNL

नविन नांदेड। ग्रामीण पोलीस स्टेशन हदतील थेट संरपच पदासाठीच्या निवडणूकीत बळीरामपुर येथे सौ.रेणुका पांचाळ, मार्कड नेहा बालाजी शिंदे, सिध्दनाथ सटवाजी शामराव तारू, पांगरी सौ .निलावती भिमराव घोगरे, यांच्यी थेट जनतेतून निवड झाली आहे तर ग्रामपंचायत सदस्य यांच्यी ही निवड झाली आहे.

१८ डिसेंबर रोजी ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत चार गावातील ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर २० डिसेंबर रोजी तहसील कार्यालय येथे मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला. सिध्दनाथ येथे थेट जनतेतून संरपचपदासाठी सटवाजी शामराव तारू हे विजयी झाले तर ग्रामपंचायत सदस्य हे निवडणूक पुर्व बिनविरोध निवड झाली,यात दुर्गजी संभाजी आवातिकर,वंदना बाई शिवाजी दगडफोडे,स्नेहा एकनाथ दगडफोड, नारायण नंदाजी आवातिरक, सुमनबाई राजेराम खाडे ,किष्णाबाई दतराम अवातिरक हे होत.

मार्कंड येथे संरपच पदासाठी नेहा बालाजी शिंदे हे निवडणून आल्या आहेत तर ग्रामपंचायत सदस्य म्हणून दिंगाबर व्यंकटराव येवले,सखु बाई हणमंता लामदाडे,एकनाथ व्यंकटराव येवले,रेणुबाई गोविंदराव येवले,आकाश हणमंता येवले, त्रिवेणी बाई भगवान बोडके हे विजयी झाले. पांगरी येथे संरपच पदासाठी सौ. निलावती भिमराव घोगरे हे थेट जनतेतून संरपचपदासाठी तर ग्रामपंचायत सदस्य म्हणून मिराताई वामनबाई गायकवाड , निर्मला गणेश मंडोजवार,राबनबी शेख अल्ली,नागीन गणपती फुलेवार,रेणुका माधव पांगरेकर,रेखा विश्वंभर हणवंते , रूपाली बळीराम चितेकर हे निवडुण आले आहेत.

ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी वरील गावात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.संरपच व ग्रामपंचायत सदस्य यांच्ये गावकऱ्यांनी फटाक्यांच्या आतिषबाजी मध्ये हार शाल श्रीफळ देऊन भव्य सत्कार केला, सिध्दनाथ येथील नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचे नांदेड दक्षिण विधानसभा भाजपाचे अध्यक्ष बालाजी पाटील पुणेगावकर,व मार्कंड येथील नवनिर्वाचित संरपच अध्यक्षा व सदस्यांचे भाजपाचे डॉ.संतुकराव हंबर्डे यांनी स्वागत सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button