Distribution of garbage bins : ग्रामपंचायत टेंभीतर्फे कचराकुंड्यांचे वाटप

हिमायतनगर| स्वच्छ भारत मिशनअंतर्गत आणि घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता अभियानाच्या पार्श्वभूमीवर, टेंभी ग्रामपंचायतीतर्फे आज गावातील कुटुंबांना ओला व सुका कचरा विलगीकरणासाठी स्वतंत्र कचराकुंड्यांचे वाटप करण्यात आले.

ग्रामपंचायतीतर्फे घनकचरा विलगीकरणासाठी टीन शेड उभारण्यात आले असून सांडपाणी व्यवस्थापनासाठी शोषखड्ड्यांची निर्मिती करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे गावातील स्वच्छता सुधारेल आणि कचऱ्याचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

आज (13 ऑगस्ट) झालेल्या कार्यक्रमाला हिमायतनगर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पि. एम. जाधव, विस्तार अधिकारी सुशीलकुमार शिंदे, विस्तार अधिकारी टारफे, पाणीपुरवठा व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे पतंगे साहेब तसेच गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सरपंच सौ. वंदना कानबाराव पोपलवार, उपसरपंच सौ. सोनूताई आनंद मुतणेपाड, ग्रामपंचायत सदस्य शेषराव पाटील, माजी सरपंच साईनाथ राजरवाड, अशोक पाटील, ग्रामसेवक अर्जुन जाधव, ग्रामपंचायत कर्मचारी प्रियांका पोपलवार, राजू शिंदे, ओमकार बिलेवाड यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने हजर होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button