कारला येथे श्री कृष्ण मंदीरात अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा….NNL

हिमायतनगर। कारला येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री कृष्ण मंदीरात अखंड हरिनाम सप्ताहचे आयोजन करण्यात आले असुन ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ काकडा,किर्तन होणार आहेत या सप्ताहाचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

कारला येथे श्री कृष्ण मंदीर कमिटी व ग्रामस्थांच्या सहकार्यातून अखंड हरिनाम सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे. हा अखंड हरिनाम सप्ताह दि. 24 डिसेंबर पासून सुरुवात होणार असुन 10 जानेवारी रोजी समाप्ती होणार आहे.

या सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम सकाळी 5 ते 6 काकडा, 7 ते 10 ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी 4:30 ते 6 हरिपाठ, रात्री 8 ते 10 हरिकीर्तन होणार आहे. ज्ञानेश्वर पारायण व्यासपीठ ह. भ.प.शिवाजी महाराज वडगावकर, हरिपाठ व काकडा ह. भ. प.मारोती महाराज राहूलवाड व सिबदरा येथील त्यांचा संच सादर करणार आहेत .दि.29 डिसेंबर रोजी नादब्रह्म संगीत संच नांदेड संचालक सचिन बोंपीलवार, कृष्णा बोंपीलवार यांच्या मैफिलीचा संगीतमय कार्यक्रम सादर होणार आहे.

तर या सप्ताहातील किर्तनकार ह. भ. प. कपिल महाराज कामारीकर, ह. भ. प. बाबुराव महाराज बासेवाड आंदेगावकर, ह. भ. प.पंढरीनाथ महाराज पळसगावकर, ह. भ. प. महारुद्र स्वामी महाराज दैठणेकर, ह. भ. प. प्रकाश महाराज वाळकेवाडीकर, ह. भ. प. कृष्णा महाराज बोंपीलवार कार्लेकर, ह. भ. प.मारोती महाराज इंद्रवेलीकर, व काल्याचे कीर्तनाने या सप्ताहाताहाचा समारोप होणार आहे. काल्याचे कीर्तन ह. भ. प.मारोती महाराज इंद्रवेलीकर यांचे होणार आहे.

या सप्ताहातील गायनाचार्य ह. भ. प.ज्ञानेश्वर महाराज बोटेवाड, ह. भ. प.मारोती महाराज राहूलवाड, ह. भ. प. आनंद महाराज गोसलवाड, ह. भ. प. भगवान महाराज गुंफलवाड, मृदंगाचार्य ह. भ. प. सुरज माने बोरीकर,  ह. भ. प. साईनाथ महाराज सिबदरेकर, तबलावादक ह. भ. प. श्रीराम आकेमवाड मंगरूळकर,हार्मोनियम ह. भ. प. रामदास महाराज बोंपीलवार कार्लेकर, चौपदार ह. भ. प. रामजी महाराज काईतवाड, विणेकरी ह. भ. प. अशोक महाराज बोंपीलवार कार्लेकर, साऊंड सिस्टीम विनोद सुरोशे यांची राहणार आहे . या अखंड हरिनाम सप्ताहास पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन कृष्ण मंदीर कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!