करियरनांदेड

सैनिकी विद्यालयास “Eat Right Campus” नामांकन : FSSAI सर्वेक्षणात जिल्ह्यातील निवडक पाच शाळांतून प्रथम

श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातील भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (FSAAI) विभागाच्या सर्वेक्षणात संस्कृति संवर्धन मंडळ सगरोळी ता,बिलोली संचलित राजर्षी श्री छत्रपती शाहू सैनिकी विद्यालयास “Eat Right Campus” नामांकन मिळाले आहे. नांदेड जिल्ह्यातील निवडक पाच शाळांतून प्रथम क्रमांक शाळेस देण्यात आला.

IMG 20250711 WA0001 1 सैनिकी विद्यालयास “Eat Right Campus” नामांकन : FSSAI सर्वेक्षणात जिल्ह्यातील निवडक पाच शाळांतून प्रथम

जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले. यावेळी असिस्टंट कमांडंट संतोष कल्लेवार आणि विलास महाजन यांनी प्रशालेच्या वतीने उपस्थित होते.

सैनिकी विद्यालयातील धान्य साठवणूक, अन्ननिर्मिती, वितरण प्रक्रिया आदींची पाहणी करून निवड करण्यात आली. नव्या पिढीस अधिक सकस आहारातून निरोगी ठेवण्यासाठी हे प्रशस्तीपत्र प्रेरणादायी ठरेल.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!