नांदेडधार्मिक

Ashtavinayak Temple ; सिडको मोढां मार्केट विकासासाठी कटिबद्ध, अष्टविनायक मंदिर मुर्ती स्थापन प्रसंगी आश्वासन..

नवीन नांदेड l नावामनपाचा सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या सिडको मोढा मार्केट विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगून अष्टविनायक मंदिरासाठी सार्वगिण विकासा साठी प्रयत्नशिल असल्याने प्रतिपादन नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार आनंदराव पाटील बोढारकर यांनी श्री.अष्टविनायक गणपती मुर्ती स्थापना प्रसंगी केले.

श्री.अष्टविनायक गणपती मंदिर संस्थान,श्री गणेश नगर, मोंढा मार्केट, लातूर फाटा, सिडको येथे 20 ऑगस्ट रोजी मुर्ती स्थापना करण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार आनंदराव बोढारंकर पाटील,शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे, नांदेड शहर प्रमुख तुलजेश यादव, सिडको शहर प्रमुख सुहास पाटील खराणे,
भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा महानगर अध्यक्ष विनोद कांचनगिरे, संतोष कांचनगिरे, माजी नगरसेविका डॉ.ललिता शिंदे, नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रमेश ठाकूर,यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी आ.बोढारकर यांनी सिडको मोंढा मार्केट अंतर्गत रस्ते नाले, दिवाबत्ती सह परिसरातील विविध भागाच्या नागरी सुविधा साठी व दक्षिण नांदेड विविध भागातील विकासासाठी दोनशे कोटी रुपये कामे नगरविकास विभागाकडे प्रास्तावित केले असल्याचे सांगून लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यी भेट घेणार असल्याचे सांगितले व अष्टविनायक मंदिर परिसर सुशोभीकरण करण्यासाठी प्रयत्न शिल असल्याचे सांगितले.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विनय पाटील गिरडे यांनी सिडको मोढां प्रकल्प अंतर्गत असलेल्या भुखंड धारकावरील सिडको प्रशासनाने लावलेल्या व्याज माफी साठी शासनदरबारी लवकरच भुखंड धारकासोबत भेट घेणार असल्याचे सांगितले, कार्यक्रमास परिसरातील विविध विभागांतील नागरीक उपस्थित होते, यावेळी उपस्थित मान्यवरांचा हस्ते मुर्ती स्थापना व विधीवत पूजन करणयात आले.
सुत्रसंचलन डॉ. रमेश नांदेडकर यांनी केले, कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री अष्टविनायक गणपती मंदिर संस्थान,सर्व पदाधिकारी, सदस्य व रहिवाशी यांनी परिश्रम घेतले, यावेळी महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!