Ashtavinayak Temple ; सिडको मोढां मार्केट विकासासाठी कटिबद्ध, अष्टविनायक मंदिर मुर्ती स्थापन प्रसंगी आश्वासन..
नवीन नांदेड l नावामनपाचा सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या सिडको मोढा मार्केट विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगून अष्टविनायक मंदिरासाठी सार्वगिण विकासा साठी प्रयत्नशिल असल्याने प्रतिपादन नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार आनंदराव पाटील बोढारकर यांनी श्री.अष्टविनायक गणपती मुर्ती स्थापना प्रसंगी केले.
श्री.अष्टविनायक गणपती मंदिर संस्थान,श्री गणेश नगर, मोंढा मार्केट, लातूर फाटा, सिडको येथे 20 ऑगस्ट रोजी मुर्ती स्थापना करण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार आनंदराव बोढारंकर पाटील,शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे, नांदेड शहर प्रमुख तुलजेश यादव, सिडको शहर प्रमुख सुहास पाटील खराणे,
भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा महानगर अध्यक्ष विनोद कांचनगिरे, संतोष कांचनगिरे, माजी नगरसेविका डॉ.ललिता शिंदे, नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाच...
