Mahur ; परभणी येथील संविधान विटंबनेंचे माहूर येथे पडसाद- तहसील व पोलीस प्रशासनाला निवेदन -NNL

श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे प्रतिकात्मक संविधानाचा अवमान केल्याचा माहूर येथे घटनेचे पडसाद उमटले असून माहूर येथील विविध संघटनाकडून आरोपीस कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी माहूर येथील संविधान प्रेमी आणि फुले, शाहू, आंबेडकर प्रेमी बांधवांनी परभणी येथे घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे दि.१३ डिसें. रोजी सकाळी ११ वाजता माहूर तहसीलचे नायब तहसीलदार कैलास जेठे आणि पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिवप्रकाश मुळे यांना शांततेत निवेदन दिले.

या निवेदनात केशव भगत, पत्रकार सिद्धार्थ तामगाडगे, मनोज कीर्तने,गोविंदराव मगरे पाटील, रेणुकादास वानखेडे,डॉ. सत्यम गायकवाड, दत्ता कांबळे,विक्रांत भगत, दीपक कांबळे मुन्ना कांबळे, कनिष्क वानखेडे, प्रवीण बर्डे, राहुल नरवाडे, शंकर कांबळे, जॉन बर्डे,राजू मगरेअमृत जगताप, विक्रम जगताप,सचिन कांबळे, पवन लांडगे, बाळू कांबळे, रणधीर कांबळे, मनोज राऊत, राजरत्न खाडे, रवींद्र, आकाश, रामदास बर्डे, ओंकार शिंदे, देवानंद भालेराव, शेख रफिक, सईद अली, नगरसेवक प्रतिनिधी निसार कुरेशी, एम. आय.एम तालुकाध्यक्ष सज्जाद आजीस, फैजल खान,यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या घटेनच्या निषेधासाठी माहूर नगर पंचायतचे नगरसेवक सागर महामुने, जेष्ठ पत्रकार विजय आमले, नंदकुमार जोशी, जयकुमार अडकीने संजय घोगरे, आदी पक्षाच्या नेते मंडळी आणि सामाजिक संघटनाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला.

या वेळी माहूर पोलीसाकडून मोठा चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सहायक पोलीस उपनिरीक्षक पालसिंग ब्राह्मण, परमेश्वर कणकावार, गेडाम,गजानन जाधव, गजानन चौधरी,सुरेश भगत आदी पोलीस स्टेशन चे कर्मचारी उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button