नांदेडलाइफस्टाइल

The Godavari river at Rahegaon : राहेगाव किक्की येथील गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे ग्रामस्थांचा संपर्क तुटला -NNL

नवीन नांदेड| नांदेड तालुक्यातील राहेगाव किक्की येथे महसूल प्रशासनाने बोट ऊपलब्ध करून दोन दिवसात १५० महिला नागरीक, युवक यांच्या बोटीच्या सहाय्याने सुटका केली असून नांदेड जिल्हाधिकारी अभिजात राऊत यांच्या आदेशानुसार नांदेड तहसीलदार संजय वारकड यांनी सहकार्य केल्याने व मंडळ अधिकारी, तलाठी यांना तात्काळ आदेश देऊन पाण्याने नुकसान झालेले शेतीच्ये पंचनामा केले.

नांदेड तालुक्यातील व दक्षिण विधानसभा मतदार संघातील राहेगाव किक्की येथील गोदावरी नदीला आलेला महापुरामुळे राहेगाव किक्की रस्त्यावरील पुलावर बॅक वॉटर आलेल्या पाण्याने शेतकरी बांधवाच्या शेतीसह पिकासह अतोनात नुकसान झाले तर नागरीकाच्या संपर्क तुटल्याने तात्काळ नांदेड तहसीलदार संजय वारकड यांनी ३ व ४ सप्टेंबर रोजी गावातील नागरिकांसाठी बोट ऊपलब्ध करून दिल्याने गावातील प्रसुती महिला, यासह आजारी नागरीक व इतर १५० ग्रामस्थांना बोटीच्या सहाय्याने गावाबाहेर काढले.

यासाठी गावातील सरपंच विलास पाटील इंगळे, पोलीस पाटील सौ.जयश्री संजय इंगळे,तंटामुक्त अध्यक्ष आनंदा गायकवाड ,सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील इंगळे, रामदास इंगळे, सुभाष इंगळे यांनी पुढाकार घेतल्याने तात्काळ नांदेड तहसीलदार संजय वारकड यांनी बोट ऊपलब्ध करून दिली व राहेगाव येथील शेतकरी यांच्ये झालेल्या नुकसान पंचनामे मंडळ अधिकारी हेमंत सुजलेगावकर, तलाठी गौतम पंढरे,यांनी ४ सप्टेंबर रोजी पाहणी करून पंचनामे केले आहेत. दोन दिवसानंतर महापुराचे पाणी ओसरल्या नंतर ग्रामस्थांची येजा चालू केली.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button