The Godavari river at Rahegaon : राहेगाव किक्की येथील गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे ग्रामस्थांचा संपर्क तुटला -NNL
नवीन नांदेड| नांदेड तालुक्यातील राहेगाव किक्की येथे महसूल प्रशासनाने बोट ऊपलब्ध करून दोन दिवसात १५० महिला नागरीक, युवक यांच्या बोटीच्या सहाय्याने सुटका केली असून नांदेड जिल्हाधिकारी अभिजात राऊत यांच्या आदेशानुसार नांदेड तहसीलदार संजय वारकड यांनी सहकार्य केल्याने व मंडळ अधिकारी, तलाठी यांना तात्काळ आदेश देऊन पाण्याने नुकसान झालेले शेतीच्ये पंचनामा केले.
नांदेड तालुक्यातील व दक्षिण विधानसभा मतदार संघातील राहेगाव किक्की येथील गोदावरी नदीला आलेला महापुरामुळे राहेगाव किक्की रस्त्यावरील पुलावर बॅक वॉटर आलेल्या पाण्याने शेतकरी बांधवाच्या शेतीसह पिकासह अतोनात नुकसान झाले तर नागरीकाच्या संपर्क तुटल्याने तात्काळ नांदेड तहसीलदार संजय वारकड यांनी ३ व ४ सप्टेंबर रोजी गावातील नागरिकांसाठी बोट ऊपलब्ध करून दिल्याने गावातील प्रसुती महिला, यासह आजारी नागरीक व इतर १५० ग्रामस्थांना बोटीच्या सहाय्याने गावाब...
