करियरनांदेड

Seshrao Patil ; शेषराव पाटील यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

श्रीक्षेञ माहूर,  कार्तिक बेहेरे l अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संस्कृती संवर्धन महामंडळ आणि मौलिक अधिकार समाजसेवा मंडळ आदिलाबाद तेलंगणा यांच्या वतीने गुरु रविदास फेस्टिवलमध्ये माहूर येथील शिक्षक शेषराव पाटील यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

तेलंगणातील आदिलाबाद मधील लक्ष्मीनगर येथील गुरु रविदास मंदिरात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरु रविदास फेस्टिवल आदिलाबादचे अध्यक्ष मधु बावलकर होते. तर जेष्ठ साहित्यिक चंद्रप्रकाश देगलूरकर, प्रशांत वंजारे, गजानन सोनोने, अशोक वासाटे, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक रमेश मुनेश्वर आदी उपस्थित होते.

गुरु रविदास जयंतीच्या निमित्ताने सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. शेषराव पाटील यांना तेलंगणाचे माजी मंत्री जोगू रामन्ना यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. पाटील हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवी आबादीचे उपक्रमशील शिक्षक आहेत. अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळाचे मराठवाडा विभागीय सचिव आहेत, तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे तालुका अध्यक्ष आहेत. त्यांचे अनेक लेख कविता वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झालेले आहेत. नांदेड जिल्ह्याचा आदर्श जिल्हा पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे.

पुरस्कार मिळाल्याबद्दल राष्ट्रसंत साईनाथ महाराज वसमतकर, नगराध्यक्ष फिरोज दोसाणी, अभियंता प्रशांत ठमके, गटशिक्षणाधिकारी कृष्णा भराडीया, अनिल महामुने,उत्तम कानिंदे, भाग्यवान भवरे, विजय घाटे, सुधिर जाधव, मिलिंद कंधारे, रणजित वर्मा, शाम राठोड, संजीव वाठोरे, डॉ.अरुण धकाते आदिनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button