Seshrao Patil ; शेषराव पाटील यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे l अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संस्कृती संवर्धन महामंडळ आणि मौलिक अधिकार समाजसेवा मंडळ आदिलाबाद तेलंगणा यांच्या वतीने गुरु रविदास फेस्टिवलमध्ये माहूर येथील शिक्षक शेषराव पाटील यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
तेलंगणातील आदिलाबाद मधील लक्ष्मीनगर येथील गुरु रविदास मंदिरात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरु रविदास फेस्टिवल आदिलाबादचे अध्यक्ष मधु बावलकर होते. तर जेष्ठ साहित्यिक चंद्रप्रकाश देगलूरकर, प्रशांत वंजारे, गजानन सोनोने, अशोक वासाटे, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक रमेश मुनेश्वर आदी उपस्थित होते.
गुरु रविदास जयंतीच्या निमित्ताने सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. शेषराव पाटील यांना तेलंगणाचे माजी मंत्री जोगू रामन्ना यांच्या हस्ते पुर...
