क्राईमनांदेड

District Collector Rahul Kardile : अवैध वाळू उत्खननावर जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांची धडक कारवाई

नांदेड| जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी अवैध वाळू उत्खननाविरोधात कडक भूमिका घेत लोहा तालुक्यातील कौडगाव येथे काल सायंकाळी धडक कारवाई केली. या कारवाईत वाळूसह वाहन व उत्खननासाठी वापरण्यात येणारी साधनसामुग्री जप्त करण्यात आली आहे.

या कार्यवाही दरम्यान वाळूने भरलेला एक हायवा ट्रक, दोन जेसीबी पोकलेन मशीन तसेच अंदाजे ४० ब्रास अवैध वाळू साठा जप्त करण्यात आला. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रकवर महसूल विभागामार्फत २ लाख ८३ हजार रुपये तसेच परिवहन विभागामार्फत ५५ हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे.

तसेच प्रत्येकी दोन जेसीबी पोकलेन मशीनवर परिवहन विभागामार्फत प्रत्येकी ७ लाख ५० हजार रुपये दंड आकारण्यात आला असून या संपूर्ण कारवाईत दोन मशीनवर एकूण १५ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

या कारवाईत लोहा तहसीलदार विठ्ठल परळीकर, नायब तहसीलदार श्री. पाठक, उस्माननगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलपत्तेवार यांच्यासह महसूल व पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधात प्रशासनाकडून यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असून दोषीवर कडक कार्यवाही करण्यात येईल असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहेत. 

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button