Sunday, June 28

Tag: against illegal sand mining

District Collector Rahul Kardile : अवैध वाळू उत्खननावर जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांची धडक कारवाई

District Collector Rahul Kardile : अवैध वाळू उत्खननावर जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांची धडक कारवाई

क्राईम, नांदेड
नांदेड| जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी अवैध वाळू उत्खननाविरोधात कडक भूमिका घेत लोहा तालुक्यातील कौडगाव येथे काल सायंकाळी धडक कारवाई केली. या कारवाईत वाळूसह वाहन व उत्खननासाठी वापरण्यात येणारी साधनसामुग्री जप्त करण्यात आली आहे. या कार्यवाही दरम्यान वाळूने भरलेला एक हायवा ट्रक, दोन जेसीबी पोकलेन मशीन तसेच अंदाजे ४० ब्रास अवैध वाळू साठा जप्त करण्यात आला. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रकवर महसूल विभागामार्फत २ लाख ८३ हजार रुपये तसेच परिवहन विभागामार्फत ५५ हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. तसेच प्रत्येकी दोन जेसीबी पोकलेन मशीनवर परिवहन विभागामार्फत प्रत्येकी ७ लाख ५० हजार रुपये दंड आकारण्यात आला असून या संपूर्ण कारवाईत दोन मशीनवर एकूण १५ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. या कारवाईत लोहा तहसीलदार विठ्ठल परळीकर, नायब तहसीलदार श्री. पाठक, उस्मानन...
error: Content is protected !!