करियरनांदेड

Mla. shreeJaya Chavan : अर्धापूरच्या शासकीय वसतिगृहास आ.श्रीजया चव्हाण यांनी दिली आकस्मिक भेट

नांदेड| अर्धापूर येथील शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या जेवणामध्ये अळया असल्याची वृत्त कळताच भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आ.श्रीजया चव्हाण यांनी वसतिगृहाला आज आकस्मिक भेट दिली. तेथील घडलेल्या प्रकाराची झाडाझडती घेतली.विद्यार्थ्यांशी संवाद साधतानाच असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी वसतिगृह प्रशासनाला आवश्‍यक त्या सूचना केल्या.

अर्धापूर शहरातील शासकीय वसतिगृहात काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांच्या जेवणात चक्क अळया निघाल्याचा प्रकार घडला. या संदर्भात येथील विद्यार्थ्यांनी सरळ तहसील कार्यालय गाठले. व घडलेल्या प्रकाराची माहिती सांगितली. तशी तक्रारही दिली.

IMG 20250911 WA0024 Mla. shreeJaya Chavan : अर्धापूरच्या शासकीय वसतिगृहास आ.श्रीजया चव्हाण यांनी दिली आकस्मिक भेट

शासकीय वसतिगृहातील जेवणात अळया निघाल्याची बातमी आ.श्रीजया चव्हाण यांना कळताच त्यांनी पूर्वसूचना न देता थेट शासकीय वसतिगृहास अचानक भेट दिली. विद्यार्थ्यांचे म्हणणे जाणून घेतले. ही घटना पंधरा दिवसांपूर्वी एका वेळच्या जेवणा दरम्यान घडली असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यानंतर आ.श्रीजया चव्हाण यांनी वसतिगृहाची संपूर्ण पाहणी केली. स्वच्छतेचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांना यापूढे असा प्रकार घडू नये अशी तंबी दिली.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!