Homeनांदेडsurgery : जन्मजात दुभंगलेले ओठ, टाळू शस्त्रक्रियेसाठी अकोला येथे 9 बालकांवर होणार...

surgery : जन्मजात दुभंगलेले ओठ, टाळू शस्त्रक्रियेसाठी अकोला येथे 9 बालकांवर होणार शस्त्रक्रिया

नांदेड| राज्यात शालेय आरोग्य तपासणी हा कार्यक्रम यशस्वी ठरल्यामुळे व कुपोषणाचा प्रश्न गंभीर असल्याने बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत आज श्री गुरुगोबिदसिघजी स्मारक जिल्हा रुग्णालय येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शल्यचिकित्सक डॉ संजय पेरके, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चंद्रशेखर अप्पनगिरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ राजाभाऊ बुट्टे यांच्या नेतृत्त्वाखाली जन्मजात दुभंगलेले ओठ व टाळूच्या शस्त्रक्रियेसाठी बालकांची तपासणी करण्यात आली. यात जिल्ह्यातील एकूण 18 बालकांची तपासणी करण्यात आली असून यापैकी 9 बालकांची शस्त्रक्रिया श्रीराम हॉस्पिटल अकोला येथे करण्यात येणार आहे.

या बालकांची तपासणी श्रीराम हॉस्पिटल अकोला येथील डॉ. मयूर अग्रवाल व डॉ. शब्बीर खान ह्या विशेषज्ञांच्या मार्फत पार पडले. नांदेड जिल्ह्यातील 45 आरोग्य पथकांद्वारे वर्षातून 2 वेळा अंगणवाडीतील व 1 वेळा शाळेतील बालकांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. 0 ते 18 या वयोगटातील बालाकंची 4D म्हणजे जन्मतः व्यंग, पोषणमुल्यांची कमतरता, शाररीक व मानसिक विकासात्मक विलंब, आजार याचे निदान व उपचार करण्यात येतात. तसेच हृदयरोग तपासणी (2D ECHO), नेत्ररोग, आकडी, फेफरे याची मोठ्या प्रमाणावर शिबिरे आयोजीत करून निदान व औषधोपचार करण्यात येते.

जिल्ह्यातील अनेक मुला-मुलींना या कार्यक्रमाचा मोफत लाभ झाला असून त्यात अनेक जणांवर हृदय शस्त्रक्रिया व इतर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील अंगणवाडी तपासणी दरम्यान कुपोषित बालकांना निदान व औषधोपचार करून श्रेणीवर्धन करण्यासाठी पोषण पुनर्वसन केंद्र स्त्री रुग्णालय श्यामनगर नांदेड येथे संदर्भित करण्यात येऊन त्यांच्या पालकास बुडीत मजुरीचा लाभ देण्यात येतो. तसेच जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र अंतर्गत 0 ते 6 वर्ष वयोगटातील ज्या बालकांना जन्मजात आजार, अवयवांच्या उणीवा आणि विकास वाढीचा अभाव आढळल्यास त्यांच्यावर वेळीच शस्त्रक्रिया, औषधोपचार करून भविष्यात त्यांना शरीराच्या गुंतागुंतीच्या आजार किंवा उणीवापासून दूर ठेवणे शक्य होत आहे.

सन 2024-25 या वर्षांमध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत सदरील हॉस्पिटलमध्ये एकूण 42 शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पालकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यासाठी RBSK जिल्हा कार्यक्रम समन्वयक अनिल कांबळे, DEIC व्यवस्थापक विठ्ठल तावडे तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत असलेले वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी व DEIC वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments