surgery : जन्मजात दुभंगलेले ओठ, टाळू शस्त्रक्रियेसाठी अकोला येथे 9 बालकांवर होणार शस्त्रक्रिया
नांदेड| राज्यात शालेय आरोग्य तपासणी हा कार्यक्रम यशस्वी ठरल्यामुळे व कुपोषणाचा प्रश्न गंभीर असल्याने बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत आज श्री गुरुगोबिदसिघजी स्मारक जिल्हा रुग्णालय येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शल्यचिकित्सक डॉ संजय पेरके, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चंद्रशेखर अप्पनगिरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ राजाभाऊ बुट्टे यांच्या नेतृत्त्वाखाली जन्मजात दुभंगलेले ओठ व टाळूच्या शस्त्रक्रियेसाठी बालकांची तपासणी करण्यात आली. यात जिल्ह्यातील एकूण 18 बालकांची तपासणी करण्यात आली असून यापैकी 9 बालकांची शस्त्रक्रिया श्रीराम हॉस्पिटल अकोला येथे करण्यात येणार आहे.
या बालकांची तपासणी श्रीराम हॉस्पिटल अकोला येथील डॉ. मयूर...
