HomeनांदेडNidhan : सरसम येथील विवेकानंद ग्यानोबा ढेमकेवाड यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

Nidhan : सरसम येथील विवेकानंद ग्यानोबा ढेमकेवाड यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

हिमायतनगर| सरसम (ता. हिमायतनगर) येथील विवेकानंद ग्यानोबा ढेमकेवाड (वय ३५) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अकाली निधन झाले.

विवेकानंद ढेमकेवाड हे देगलूर येथील वनविभाग कार्यालयात वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्या पार्थिवावर आज सोमवार, दि. २९ रोजी सायंकाळी ६.०० वाजता त्यांच्या मूळ गावी सरसम बु., ता. हिमायतनगर येथे म्हसोबा नाल्याजवळील शेतात अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी, आई-वडील, भाऊ व भावजयी असा मोठा परिवार आहे.

ते अर्धापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चित्तरंजन ढेमकेवाड यांचे मोठे बंधू असून, पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवाड व देवानंद शिवण्णा मंडलवाड यांचे भाचे होत.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments