महाराष्ट्र

राजपूत (भा) समाजाविषयी लक्ष्मण हाकेचं वादग्रस्त विधान; पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून निषेध -NNL

पुणे। राजपूत (भा) समाजा विषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या लक्ष्मण हाके याच्यावर शासनाने तात्काळ योग्य ती कारवाई करावी या स्वरूपाची मागणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदनाद्वारे पुण्याचे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राजपूत समाज संगठन पिंपरी चिंचवड शहर व राजपूत समाज सभा पुणे या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की गुरूवार दि. २७ जून २०२४रोजी वाशिम मध्ये tv9 या चॅनलच्या माध्यमातून लक्ष्मण हाके यानी राजपूत (भामटा) समाजा बदल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामूळे संपूर्ण महाराष्ट्रातील राजपूत समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, लक्ष्मण हाके हे ओबीसी आरक्षणाच्या नावाखाली क्षत्रिय मराठा समाज व क्षत्रिय राजपूत समाजाला टार्गेट करत समाजा समाजात तेढ निर्माण करण्याचे चुकीचे काम करत आहेत, अश्या समाज द्रोही व्यक्तीला महाराष्ट्रात फिरण्यावर तात्काळ प्रभावाने बंदी घालावी,लक्ष्मण हाकेच्या चुकीच्या विधानामुळे महाराष्ट्रातील राजपूत समाजात प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

IMG 20240628 WA0063 राजपूत (भा) समाजाविषयी लक्ष्मण हाकेचं वादग्रस्त विधान; पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून निषेध -NNL

यासाठी राज्याच्या गृह विभागा कडून उचित कार्यवाही होने खूप गरजेचे आहे जेणेकरून राज्यातील सामाजिक अस्थिरता बिघडून शांतता भंग होणार नाही व स्वतःच्या प्रसिद्धीसाठी हापापलेल्या हाके सारख्या नालायक, नतभ्रष्ट,समाजकंटक,समाजद्रोहींचे कटकारस्थान व मनसुब्यांना आळा बसण्यास मदत होईल. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाकेला पाठीशी घालून त्याच्यावर उचित कार्यवाही न केल्यास त्यामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याला पुर्णपणे हाके व राज्य सरकार जबाबदार राहील अशा प्रकारचा इशारा यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

IMG 20240628 WA0062 राजपूत (भा) समाजाविषयी लक्ष्मण हाकेचं वादग्रस्त विधान; पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून निषेध -NNL

याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन देतांना राजपूत समाज संगठन पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष ठा.शिवकुमारसिंह बैस,राजपूत समाज सभा पुणे उपाध्यक्ष हेमलता परदेशी, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष करणी सेना विलास कच्छवे,शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) उपजिल्हाप्रमुख, नांदेड डाॅ.प्रा.राम चव्हाण,ॲड.डाॅ.श्रीराम परदेशी,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना राणा अशोक इंगळे, मनोहर पाटील,निवृती चव्हाण,संजित परदेशी यासह इतर समाज बांधव उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!