शिवमहापुरण कथेच्या अनुषंगाने महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ अन्वये अधिसूचना जारी -NNL

नांदेड। शहरात मामा चौक, मैदान जुना कौठा, नांदेड येथे दिनांक 23/08/2024 ते दिनांक 29/08/2024 या कालावधी मध्ये पंडीत श्री प्रदिप मिश्रा (सिहोरवाले) यांचे उपस्थितीत शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले असुन, सदर शिवमहापुराण कथा कार्यक्रमास जिल्हयातील व परीसरातील मोठ्या प्रमाणात भावीक येण्याची शक्यता असल्याने शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतुक वाढल्यास वाहतुकीची कोंडी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सदर कालावधीत शांतता व सुव्यवस्था राखणेकामी येणाऱ्या जाणाऱ्या वाहन धारकांना व ईतर रहदारीस अडथळा होणार नाही याकरीता मी अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड मला महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारान्वये दिनांक 23/08/2024 ते दिनांक 29/08/2024 पर्यन्त दररोज 09.00 ते 19.00 वा. पर्यंत वरील कलमान्वये खालील प्रमाणे वाहतूकीच्या नियमना संबंधाने अधिसूचना काढत आहे.

शिवमहापुराण कथा कार्यक्रमासाठी बाहेरुण येणारे वाहतुकीस बंद असलेले मार्ग

कथा कार्यक्रमासाठी परभणी- वसमत-पुर्णा कडुन येणारी वाहतुक छत्रपती चौक- तरोडा नाका राज कॉर्नर- वर्कशॉप ते वजिराबाद चौकाकडे येणारी वाहतुक बंद राहील. 2. कथा कार्यक्रमासाठी अर्धापुर कडुन येणारी वाहतुक शंकरराव चव्हाण चौक- नमस्कार चौक- महाराणा प्रताप पुतळा ते शहरात येणारी वाहतुक पूर्ण पणे बंद राहील. कथा कार्यक्रमासाठी लिंबगाव कडुन येणारी वाहतुक हि वाघी रोड- पोलीस मुख्यालय- तिरंगाचौक- गोवर्धनघाट पुल मार्गे जाणारी वाहतुक बंद राहील.

शिवमहापुराण कथा कार्यक्रमस्थळाकडे जाण्यासाठी वाहतुकी करीता पर्यायी मार्ग कार्यक्रमासाठी परभणी- वसमत पूर्णा कडुन येणारी वाहतुक हि छत्रपती चौक- मोर चौक- पिवळी बिल्डीगं- कथा खडकपुरा अंडरब्रिज- वाघीरोड हस्सापुर ब्रिज ते कार्यक्रमाचे पार्कीगंचे ठिकाणी

कथा कार्यक्रमासाठी अर्धापुर कडुन येणारी वाहतुक आसना पुल ओव्हर ब्रिज धनेगाव चौक- दुधडेअरी आंबेडकर चौक- बसवेश्वर चौक- मामाचौक ते पार्कीगंचे ठिकाणी, कथा कार्यक्रमासाठी लिंबगाव कडुन येणारी वाहतुक हि वाघी रोड- हस्सापुर ब्रिज ते कार्यक्रमाचे पार्कीगंचे ठिकाणी, कथा कार्यक्रमासाठी नायगांवकडुन येणारी वाहतुक हि धनेगाव चौक- दुधडेअरी- आंबेडकर चौक बसवेश्वर चौक- मामा चौक ते पार्कीगचे ठिकाणी.

नोट- शिवमहापुराण कथेस परभणी, वसमत, पुर्णा, लिंबगाव, अर्धापुर, नायगांव, मुदखेड मार्गे येणारे भावीकांना वरील दिलेल्या पर्यायी मार्गाचा येण्या-जाण्यासाठी वापर करावा, तरी उपरोक्त प्रमाणे दिनांक 23/08/2024 ते दिनांक 29/08/2024 पर्यन्त दररोज 09:00 ते 19:00 वा.पावेतो वाहतूकीस अडथळा होऊ नये याकरीता पर्यायी मार्गाची अधिसूचना प्रसिध्द करण्यात येत आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button