क्राईमनांदेड

कामळज व कौडगाव गोदावरी नदी पात्रावर उस्माननगर व स्था.गु.शा. पोलिस पथकांची संयुक्त रित्या अवैध वाळू उपसा करणाऱ्या इसमाविरुद्ध कारवाई

उस्माननगर l उस्माननगर येथील पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सपोनि संजय निलपत्रेवार व स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि आरसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या पथकासह हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना मौजे कौडगाव व कामळज ता.लोहा येथील गोदावरी नदी पात्रातून बोटी व फायबरच्या साह्याने विनापरवाना अवैधरित्या गौण खनिज रेती साठा करीत असलेल्या ठिकाणी दोन पथकासह छापा टाकून ७५,००,००० रुपयांचा मुद्देमालासह चौघांना ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,
मा.श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक साहेब, नांदेड यांनी “ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना पोलीस स्टेशन हद्दीत अवैध रेतीची चोरटी वाहतुक व विक्री करणारे चालक व मालक या लोकांवर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन उस्माननगर येथील सपोनि संजय निलपत्रेवार, स्थागुशा येथील सपोनि आरसेवार असे नमुद पथका सह हदीत पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदार यांचेकडुन गोपनीय माहीती मिळाली की, मौजे कौडगाव ता. लोहा व मौजे कामळज ता. लोहा गोदावरी नदीपात्रातुन बोटी व फायबरच्या साहयाने विनापरवाना अवैधरित्या गौण खनिज रेतीसाठा करीत आहेत.

सदर खात्रीशिर बातमी मिळाल्यावरुन दोन वेगवेगळे पथकासह सदर ठिकाणी छापा कार्यवाही केली असता मौजे कौडगाव ता. लोहा येथील गोदावरी नदीचे पात्रात पथक क्रमांक एक यांना दोन मोठे बोट (फायबर) व दोन छोटे इंजिन बोट (फायबर) व मौजे कामळज ता. लोहा येथील गोदावरी नदीचे पात्रात पथक क्रमांक 2 यांना एक मोठे बोट (फायबर) व एक छोटे इंजिन बोट (फायबर) मिळून आले बोटीवर रेती उपसा करणारे ईसम पोलीस पथकास पाहुन पळून गेले. त्यानंतर सपोनि संजय निलपत्रेवार यांनी मंडळ अधिकारी श्रीमती पवार मॅडम यांना संपर्क साधला असता त्यांनी कळविले को, लोखंडी बोटीच्या सहाय्याने रेती उपसा करण्यास कार्यालयातुन कोणालाही परवानगी दिलेली नाही.

सदरील रेती साठा अवैध रित्या उपसा करत आहेत, अशी खात्री झाल्याने त्याबाबत मंडळ अधिकारी श्रीमती पवार मॅडम यांनी तसा रितसर पंचनामा पंचासमक्ष करुन दिल्याने खालील प्रमाणे मुद्देमाल जप्त केला आहे. 1. तिन मोठ्या लोखंडी बोटी (फायबर) किंमती अंदाजे 45,00,000/- रुपये, 2. तिन छोटे इंजन बोट एकूण किमती अंदाजे 30,00,000/- रुपये असा एकुण 75,00,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तसेच सदर बोटी महसुल अधिकारी यांचे समक्ष जाग्यावरच नष्ट केलेल्या आहेत, त्यानंतर बोट मालकांची माहिती घेवून त्यांचेविरूध्द पोलीस स्टेशन उस्माननगर येथे नमुद प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उस्माननगर पोलीस पथक व स्थानिक गुन्हे शाखा नांदेड यांचे पथकाने अवैध रेती उपसा करणारे ईसमांवर कारवाई करुन उत्कृष्ट कामगीरी केल्याने मा. श्री अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी पोलीस पथकाचे कौतुक करुन अभिनंदन केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button