कामळज व कौडगाव गोदावरी नदी पात्रावर उस्माननगर व स्था.गु.शा. पोलिस पथकांची संयुक्त रित्या अवैध वाळू उपसा करणाऱ्या इसमाविरुद्ध कारवाई
उस्माननगर l उस्माननगर येथील पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सपोनि संजय निलपत्रेवार व स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि आरसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या पथकासह हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना मौजे कौडगाव व कामळज ता.लोहा येथील गोदावरी नदी पात्रातून बोटी व फायबरच्या साह्याने विनापरवाना अवैधरित्या गौण खनिज रेती साठा करीत असलेल्या ठिकाणी दोन पथकासह छापा टाकून ७५,००,००० रुपयांचा मुद्देमालासह चौघांना ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,
मा.श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक साहेब, नांदेड यांनी "ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना पोलीस स्टेशन हद्दीत अवैध रेतीची चोरटी वाहतुक व विक्री करणारे चालक व मालक या लोकांवर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन उस्माननगर येथील सपोनि संजय निलपत्रेवार, स्थागुशा येथील सपोनि आरस...




