नांदेडधार्मिक

CIDCO ; सिडको येथील स्वामी समर्थ केद्रांत श्री दत्त जयंती अखंड नाम जप यज्ञ सप्ताह उत्साहात प्रारंभ – NNL

नवीन नांदेड l अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग(दिंडोरी प्रणित)
श्री दत्तजयंती अखंड नाम-जप-यज्ञ सप्ताहदि. ०९ डिसेंबर ते दि. १६ डिसेंबर २०२४ सप्ताहाचे आयोजन सिडको परिसरातील रामनगर येथील स्वामी समर्थ केद्रं येथे उत्साहात प्रारंभ झाला असुन महिला भाविक भक्तांनी मोठया प्रमाणात सहभाग नोंदविला आहे.

दैनंदिन कार्यक्रम दैनंदिन सेवा, नित्यस्वाहाकार, भुपाळी आरती, सामुहिक गुरुचरित्र वाचन, नैवेद्य आरती विशेष याग , विशेष सेवा व पारायण सायंकाळी औदुंबर प्रदक्षिणा नैवेद्य आरती विशेष याग मंडल स्थापना, अग्निस्थापना, स्थापित देवता हवन व पारायणास सुरुवात झाली.
गणेश याग/मनोबोध याग,गीताई याग स्वामी याग, विष्णु यागचंडी याग रुद्र याग / मल्हारी याग बलि पूर्णाहुती, श्रीदत्त जन्मोत्सवश्री सत्यदत्त पूजन, देवता विसर्जन,अखंड नाम-जप-यज्ञ सप्ताह सांगता होणार असून मध्ये 16, डिसेंबर रोजी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले असून गोळवलकर गुरुजी रक्तपेढी यांच्या वतीने रक्त संकलन होणार आहे.
अखंड नाम जप यज्ञ सोहळयात परिसरातील अनेक महिला भाविक भक्तांनी मोठया प्रमाणात सहभाग नोंदविला असून मोठ्या उत्साहात सप्ताह प्रारंभ झाला आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button