नांदेडकरियर

Sahayog Pharmacy College ; सहयोग कॅम्पस च्या फार्मसी कॉलेज चे यश

नवीन नांदेड l नांदेडमधील नामांकित आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या सहयोग सेवाभावी संस्थे अंतर्गत चालणाऱ्या फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन (MSBTE) आयोजित डी.फार्मसी परीक्षेत अत्युत्कृष्ट कामगिरी करत कॉलेजचा झेंडा उंचावला आहे. या यशस्वी निकालामुळे महाविद्यालयात व शिक्षण क्षेत्रात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रथम वर्षातील यशस्वी विद्यार्थी: शेख रिहान शेख काय्युम – 72.40%, सानिया बेगम सय्यद हैदर – 72.40%, फातिमा सुल्ताना गुलाम मोह्सिन – 71.80%, कोल्हे रुतुजा मनोहर – 69.70%, राजमाने श्रद्धा श्रीकिशन – 70.40%, बोडके प्रतीक नारायण – 70.40% द्वितीय वर्षातील उज्ज्वल विद्यार्थी: पितलेवाड आकांक्षा बालाजी – 82.46%, देशमुख हरिओम विलासराव – 80.18%, लाभशेटवार सांभवी गोपीनाथ – 80.00%, शेख शाहबाज अली निजामुल्ला – 80.18%, राठोड अनामिका प्रकाश – 79.27%, शेख साहिल जाहेद – 70.55%
या निकालांवरून स्पष्ट होते की विद्यार्थ्यांनी प्रामाणिक मेहनत घेतली असून त्यांना शिक्षकांचे उत्तम मार्गदर्शन लाभले आहे. या यशात केवळ परीक्षेतील गुण नव्हे, तर शिस्तबद्ध अभ्यास, सकारात्मक दृष्टीकोन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांचा मोलाचा वाटा आहे.

या विशेष यशाबद्दल सहयोग सेवाभावी संस्थेचे सचिव डॉ. संतुकराव हंबर्डे यांनी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि संपूर्ण महाविद्यालय परिवाराचे मन:पूर्वक अभिनंदन केले. त्यांनी म्हटले की, “विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमांना आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाला मिळालेला हा प्रतिसाद अत्यंत समाधानकारक आहे. हे यश त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक पायरी ठरेल. डॉ. हंबर्डे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या असून, त्यांच्याकडून भविष्यातही अशाच प्रेरणादायी कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button