सोशल वर्कनांदेड

Social Welfare Department ; समाज कल्याण विभागाच्या सेस फंडातील योजनासाठी 26 ऑगस्टपर्यत अर्ज करण्याचे आवाहन – NNL

नांदेड| जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत सन 2024-25 या आर्थिक वर्षात 20 टक्के सेस मागासवर्गीय निधीतून विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनासाठी पात्र लाभार्थ्यांनी 26 ऑगस्ट 2024 पर्यत पंचायत समितीकडे सर्व कागदपत्रासह अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी केले आहे.

या योजनांमध्ये मागासवर्गीयांना पिठाची गिरणी पुरविणे, मागासवर्गीयांना झेरॉक्स मशिन, प्रिंटर, लहान मशिन अनुदान, मागासवर्गीयांना उदरनिर्वाहासाठी फिरते स्टॉल अनुदान, मागासवर्गीय गुणवंत विद्यार्थ्यांना सायकल पुरविणे, मागासवर्गीय महिलांना 100 टक्के अनुदानावर शिलाई मशीन अनुदान, मागासवर्गीयाना मिरची कांडप अनुदान, मागासवर्गीय गुणवंत विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षासाठी प्रोत्साहनपर अनुदान, मागासर्गीय व्यक्तीना दुग्ध व्यवसायासाठी गाई व म्हैस पुरविणे, निराधार/विधवा/परितक्त्या, घटस्फोटीत एकल मागासवर्गीय महिलांना उपजिविकेसाठी सहाय्य करणे या योजनाचे अर्ज माहिती पत्रकासह सर्व पंचायत समिती स्तरावर उपलब्ध आहेत. लाभार्थ्यांनी पंचायत समितीकडे संपर्क साधून अर्जामध्ये नमुद केलेल्या सर्व कागदपत्रासह अर्ज 26 ऑगस्ट पर्यत पंचायत समिती कार्यालयात सादर करावेत. तसेच अधिक माहितीसाठी समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद येथे संपर्क साधावा, असेही जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button