Social Welfare Department ; समाज कल्याण विभागाच्या सेस फंडातील योजनासाठी 26 ऑगस्टपर्यत अर्ज करण्याचे आवाहन – NNL
नांदेड| जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत सन 2024-25 या आर्थिक वर्षात 20 टक्के सेस मागासवर्गीय निधीतून विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनासाठी पात्र लाभार्थ्यांनी 26 ऑगस्ट 2024 पर्यत पंचायत समितीकडे सर्व कागदपत्रासह अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी केले आहे.
या योजनांमध्ये मागासवर्गीयांना पिठाची गिरणी पुरविणे, मागासवर्गीयांना झेरॉक्स मशिन, प्रिंटर, लहान मशिन अनुदान, मागासवर्गीयांना उदरनिर्वाहासाठी फिरते स्टॉल अनुदान, मागासवर्गीय गुणवंत विद्यार्थ्यांना सायकल पुरविणे, मागासवर्गीय महिलांना 100 टक्के अनुदानावर शिलाई मशीन अनुदान, मागासवर्गीयाना मिरची कांडप अनुदान, मागासवर्गीय गुणवंत विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षासाठी प्रोत्साहनपर अनुदान, मागासर्गीय व्यक्तीना दुग्ध व्यवसायासाठी गाई व म्हैस पुरविणे, निराधार/विधवा/परितक्त्या, घटस्फोटीत ...
