नांदेडलाइफस्टाइल

Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात

हिमायतनगर, अनिल मादसवार| स्वस्त, सहज उपलब्ध आणि कोणतीही वैद्यकीय परवानगी नसलेला ‘स्टिक फास्ट’ (चिकट रसायनयुक्त पदार्थ) आज अनेक मुलं व अल्पवयीन तरुणांच्या नशेचा घातक पर्याय बनत चालला आहे. दस्तीवर टाकून किंवा वास घेऊन नशा करण्याचे प्रकार शहरासह ग्रामीण भागात वाढत असून, यामुळे मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे.

विशेष म्हणजे, ही नशा अतिशय कमी खर्चात मिळत असल्याने शाळकरी वस्तीतील मुलं, कामगार वस्त्या आणि झोपडपट्टी भागात मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. काही मुले थेट सार्वजनिक ठिकाणी, गल्लीबोळात किंवा ओसाड जागी दस्तीवर स्टिक फास्ट लावून नशा करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

आरोग्यावर गंभीर परिणाम – वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, स्टिक फास्टमध्ये असलेली रसायने मेंदू, फुफ्फुसे, यकृत व मज्जासंस्थेवर गंभीर परिणाम करतात. चक्कर येणे, स्मरणशक्ती कमी होणे, श्वास घेण्यास त्रास, मानसिक अस्थैर्य, दीर्घकाळ वापर केल्यास मृत्यूचा धोका होऊ शकतो असे गंभीर परिणाम संभवतात.

पालकांची चिंता, समाजात अस्वस्थता
मुलांच्या वर्तनात बदल, चिडचिड, अभ्यासाकडे दुर्लक्ष, एकटेपणा यासारखी लक्षणे दिसत असून, पालकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे. “ही नशा दारू व इतर अमली पदार्थांइतकीच धोकादायक असूनही याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

images 9 2 Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात

बंदीची मागणी जोर धरतेय
सामाजिक कार्यकर्ते, पालक व नागरिकांनी स्टिक फास्ट व तत्सम रसायनांच्या खुले विक्रीवर तात्काळ बंदी आणावी, तसेच किराणा व हार्डवेअर दुकानांवर विक्रीवर नियंत्रण आणावे, अल्पवयीनांना विक्री केल्यास कडक कारवाई, शाळा व महाविद्यालयांत जनजागृती मोहिमा राबवाव्यात, अशी जोरदार मागणी केली आहे.

प्रशासनाने हस्तक्षेप करण्याची गरज
ही नशा पुढील काळात गंभीर सामाजिक समस्या बनण्याची शक्यता असून, वेळीच कठोर पावले उचलली नाहीत तर संपूर्ण पिढी व्यसनाच्या गर्तेत अडकू शकते, असा इशाराही जाणकारांकडून देण्यात येत आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!