Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात
हिमायतनगर, अनिल मादसवार| स्वस्त, सहज उपलब्ध आणि कोणतीही वैद्यकीय परवानगी नसलेला ‘स्टिक फास्ट’ (चिकट रसायनयुक्त पदार्थ) आज अनेक मुलं व अल्पवयीन तरुणांच्या नशेचा घातक पर्याय बनत चालला आहे. दस्तीवर टाकून किंवा वास घेऊन नशा करण्याचे प्रकार शहरासह ग्रामीण भागात वाढत असून, यामुळे मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे.
विशेष म्हणजे, ही नशा अतिशय कमी खर्चात मिळत असल्याने शाळकरी वस्तीतील मुलं, कामगार वस्त्या आणि झोपडपट्टी भागात मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. काही मुले थेट सार्वजनिक ठिकाणी, गल्लीबोळात किंवा ओसाड जागी दस्तीवर स्टिक फास्ट लावून नशा करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
आरोग्यावर गंभीर परिणाम - वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, स्टिक फास्टमध्ये असलेली रसायने मेंदू, फुफ्फुसे, यकृत व मज्जासंस्थेवर गंभीर परिणाम करतात. चक्कर येणे, स्मरणशक्ती कमी होणे, श्वास घेण्या...
