नांदेडलाइफस्टाइल

Dr.Hansraj Vaidya : उद्या 18 रोजी न भूतो “ज्येष्ठ नागरिकांची लक्षवेधी मागनी पदयात्रा-डाॅ.हंसराज वैद्य -NNL

नांदेड| केंद्र व राज्य शासन अनेक लोकपयोगी तथा लोकप्रिय योजना कार्यान्वित करून अंमल बजावनी करताना दिसत आहेत. केंद्र शासनाने “आयुष्यमान भारत योजना,प्रधान मंत्री वयोश्री योजना,तर महाराष्ट्र शासनाने मुख्य मंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यान्वित करून अंमल बजावनी करत आहेत.

पण ज्येष्ठ नागरिकांचे अनेक प्रश्न अनेक वर्षा पासून शासन दरबारी प्रलंबित आहेत.ज्येष्ठ नागरिकांच्या फेस्काॅम महासंघ व आयस्काॅन वरिष्ठ संघटणा,सहयोग ज्येष्ठ नागरिक संघासह राज्यातील इतरही ज्येष्ठ नागरिक संघ शासनाकडून त्या सोडऊन घेण्यासाठी सतत पाठपुरावा करत आहेत.पण स्थानिक लोकप्रतिनिधी, केंद्र व राज्य शासनही त्यांच्या मागण्यांकडे फारसे सकारात्मक दृष्टीने व संवेदनशील रित्या पहाण्यास तयार नाहीत! म्हणून उद्या दि.18/9/24 रोजी स्थानिक लोक प्रतिनिधी, महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी नांदेड येथे ज्येष्ठ नागरिकांची न भूतो “ज्येष्ठ नागरिक लक्षवेधी मागनी पदयात्रा” काढण्यात येणार..!

सर्व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनी कलामंदिर मैदानावर सकाळ पासूनच जमणार असून,डाॅ.हंसराज वैद्य त्यांना मार्ग दर्शन करणार आहेत.सकाळी आकरा वाजता नांदेडचे ज्येष्ठ समाजिक कार्यकर्ते मा.नविनजी भाई ठक्कर व नांदेडच्या ज्येष्ठ नागरिक संघांचे आधारस्तंभ मा.सुभाषरावजी बार्‍हाळे हे ज्येष्ठ नागरिकांच्या पदयात्रेस हिरवी झंड्डी दाखवतील. पद यात्रेत ज्येष्ठ महिला-पुरूष चार चारच्या साखळीनीं एकमेकास आधार देत अत्यंत सावकाश चालणार आहेत.

पदयात्रा स्वंयशाशित व अत्यंत शिस्तित कलामंदिर,शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय,वैद्य रूग्णालय-जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय, वजिरा बाद-मुथा चौक, श्री छ.शिवाजी महाराज पुतळा,महानगर पालिका कार्यालय-सिव्हील हाॅस्पिटल समोरून जिल्हाधिकारी कार्यालया समोर प्रस्थान करेल. जिल्हाधिकारी महोदया मार्फत सर्व मा.प्रधान मंत्रीजी, नितीनजी गडकरी,मुख्य मंत्रीजी, उपमुख्य मंत्रीजी द्वयांना निवेदन पाठऊन देण्यात येतील.ज्येष्ठ नागरिक जनतेचे, स्थानिक लोक प्रतिनिधींचे,राज्य शासनाचे तथा केंद्र शासनाचे लक्ष वेधण्या साठी लाक्षणिक अन्न-पाणी त्याग(उपोषण) करतील! संद्याकाळी साडेचार दर्म्यान पदयात्रा व अन्न-पाणी त्याग अंदोलनाची सांगता होइल!

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button