नांदेड

Nanded Merchant : नांदेड मर्चट बँकेची ६३ वी वार्षिक सभा शांततेत संपन्न

बँक एनपीएस शून्य टक्के
सभासदाचा एक लक्ष रुपयांच्या अपघाती विमा
साडे आठ टक्के लाभांश
लातूर -आखाडा बाळापूर येथे दोन नवीन शाखा सुरू होणार

नांदेड| मराठवाड्यात दूसरी शेड्यूल बँक होण्याकडे नांदेड मर्चट बँकेवी वाटचाल सुरु आहे. येत्या काळात हा दर्जा निश्वितच प्राप्त होईल. सभासदांच्या हिताकडे ध्यान देत, बँकेने आपलया बॅंकेची वाटचाल गेल्या ६३वर्षापासून प्रगतीच्या दिशेने सुरू ठेवली आहे .बँकेला या आर्थिक वर्षात ७ कोटी २७ लक्ष इतका नफा झाला असून एनपीए शून्य टक्के इतका आहे . सभासदांना साडे आठ टक्के लाभांश देण्यात आला असून प्रत्येक सभासदांचा एक लाख रुपयांचा अपघाती विमा काढ‌ण्यात आला असून येत्या काळात दोन नवीन शाखा सुरु होणार आहे.सभासदांचे सहकार्य व ग्राहकांचा विश्वास ही वाटचाल सुरू आहे यापूढेही अशीच साथ मिळेल असे संबोधन नांदेड मर्चंट बैंकेचे अध्यक्ष दिलीप कंदकूर्ते यांनी केले

नांदेड शहरातील शिवाजी नगरातील विसावा पॅलेस येथे दि-नादेड मर्जट को-ऑप बँकेची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेचे अध्यक्ष दिलीप कुंदकुर्ते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. उपाध्यक्ष
लक्ष्मणराव संगेवार , माजी अध्यक्ष जेष्ठ संचालक ज्ञानेश्वर महाजन , मुख्य कार्यकारी अधिकारी सनतकुमार बनवसकार , संचालिका वसुधा तगडपल्ले , उमेश जालनेकर, रविकुमार कासलीवाल, श्रीमती प्रभादेवी देव, ओमप्रकाश राखेवार, जी. एस. चिटमलवार दिपक चन्नावार, सुनील मानधनी ,श्रीकांत वट्टमवार, अरुण चालिकवार, कैलास राठी, हरिहर धुतमतल, विजय वटटमवार (तज्ञ संचालक) याची उपस्थिती होती

बँकेचे अध्यक्ष दिलीप कंदकूर्ते, ६३ वा वार्षिक सर्वसाधारण सभेचा अहवाल वाचन केला. त्यांनी बँकेच्या वाटचालीत सभासदाचे असलेले योगदान अधोरेखित केले. यावर्षीही बँकेला अ वर्ग ‘अँडीट दर्जा मिळाला असून लाभांश आरबीआयच्या नवीन नियमानुसार साडे आठ टक्के आपण जाहीर केला आणि तो सभेनंतर प्रत्येकाच्या बँक खाती जमा होणार आहे असे सांगितले.

लातूर व आखाडा बाळापूर येथे नव्या दोन बँक शाखा सुरु करण्यात येत आहेत . सभासदांचा एक लाख रुपयांचा अपघाती विमा दरवर्षी काढतो यंदा तो काढला असून बँकेत जेष्ठ नागरिकां बाबत काही करता येईल काय यावर आम्ही निश्चित प्रयत्न करू आपली बँक शेड्यूल बँक व्हावी या दृष्टीने वाटचाल सुरू असून आपली साथ -सहकार्य असावे असे अहवान बँकेचे अध्यक्ष दिलीप कंदकूर्ते यांनी केले बँकेचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव संगेवार जेष्ठ संचालक ज्ञानेश्वर महाजन जी. एस. चिटमलवार रवीकुमार कासलीवाल यांनी ठराव मोडले. वार्षिक सर्वसाधारण सभेतील सर्व ठराव एकमताने व टाळ्यांच्या गजरात सभासदांनी मंजूर केले यावेळी बँकेच्या अधिकारी प्रतिभा देशमुख यांनी संचलन व अहवाल वाचन केले सभासदांच्या शंकाचे निरासरण केले.

नव्याने रुजू झालेले बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सनतकुमार बनवसकर यांचा बँकेचे अध्यक्ष श्री कंदकूर्ते यांनी सत्कार केला. गोंडवणा विद्यापीठाचे पूर्व कुलगुरु कल्याणकर संपादक शंतनू डोईफोडे, राजेंद्रसिंह शाहू , विष्णू मानधनी राजेंद्र भारतीया, अशोकसिंह रावत, रंगभूमी सदस्य राम चव्हाण बालाप्रसाद पारेख, नित्यानंद मैय्या, पवन गादेवार, काळे गुरुजी, दिगबर लाभशेठवार यांच्या हस्ते दहावी बारावी मध्ये ऐंशी टक्के पेक्षा अधिक गुण घेणाऱ्या सभासदांचा व बँक कर्मचाऱ्याच्या पाल्यांचा विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ‘आरंभी सरस्वतीचे पुजन करण्यात आले. त्यानंतर ज्ञात अज्ञात मरण पावलेल्याना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. बँकेच्या कर्मचाऱ्याऱ्यांनी यासाठी परिश्रम घेतले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button