नांदेडराजकीय

Ncps Political Move : हिमायतनगरात राष्ट्रवादी काँग्रेसची राजकीय चाल — भाजपला खिंडार!

हिमायतनगर, अनिल मादसवार| राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) तालुका अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर वामनराव पाटील वडगांवकर यांनी पहिल्याच टप्प्यात मोठी राजकीय चाल खेळली आहे. त्यांनी हिमायतनगर भाजप युवा मोर्चाचे माजी शहराध्यक्ष शीतल सेवनकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते दाखल करून घेतले आहे.

या प्रवेशामुळे हिमायतनगरातील भाजपला मोठा धक्का बसल्याचे राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. भाजपच्या सक्रिय युवा नेतृत्वानेच विरोधी पक्षात प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची सुरुवात झाली आहे. शीतल सेवनकर हे शहरातील वॉर्ड क्रमांक १ मधील रहिवासी असून, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर येणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीत उमेदवारीचे दावेदार म्हणून त्यांचे नाव पुढे येत आहे.

IMG20251022202653 01 Ncps Political Move : हिमायतनगरात राष्ट्रवादी काँग्रेसची राजकीय चाल — भाजपला खिंडार!

बुधवारी शीतल सेवनकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते जिल्हाध्यक्ष बाळासाहेब रावणगांवकर यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला आहे. याची माहिती मिळताच हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरासमोर फाटक्याच्या अतिशबाजीत रात्री 9 वाजता भव्य स्वागत करण्यात आले. 

यावेळी शहर आणि ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी शाल, पुष्पहार देऊन त्यांचे जल्लोषात स्वागत केले. “एकच वादा अजितदादा… अजितदादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं!”, “शीतल भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं!” दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांच्या आतषबाजीने आणि घोषणाबाजीने मंदिर परिसर दणाणून गेला होता.

या सत्कार सोहळ्या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे हिमायतनगर तालुका अध्यक्ष वामनराव पाटील वडगांवकर, शहराध्यक्ष अमोल पाटील धुमाळे, अभिलाष जयस्वाल, आकाश पाटील सूर्यवंशी, आनंद गोसलवाड, साहेबराव बलपेलवाड, मंगेश धुमाळे पाटील, ओमकार चरलेवार, दत्ता माने चातारीकर, गणेश पाटील कदम विरसनी, संजूभाऊ गोसलवाड, पंढरीनाथ राहुलवाड, निखिल बिज्जेवार, तेजस मुधोळकर, अवधूत नामेवार, ज्ञानेश्वर कोरडे, दत्ता कुपटे, अभय जेलेवार, आकाश बास्टेवाड, साईनाथ भोईर, अनिल मिसाळे तसेच अनेक कार्यकर्ते व मित्रमंडळ युवक उपस्थित होते. आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हिमायतनगर नगरपंचायतीवर सत्ता मिळविण्यासाठी मोठ्या ताकदीने तयारी करत असल्याचे या प्रवेशामुळे स्पष्ट झाले आहे.

IMG20251022202725 01 Ncps Political Move : हिमायतनगरात राष्ट्रवादी काँग्रेसची राजकीय चाल — भाजपला खिंडार!
oplus_0

शीतल सेवनकर यांचे वक्तव्य “महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या कार्यशैलीवर प्रभावित होऊन मी तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस जास्तीत जास्त जागा काबीज करून हिमायतनगर शहराला विकासाच्या दिशेने पुढे नेईल, असा मला विश्वास आहे.”— शीतल सेवनकर,  माजी शहराध्यक्ष, भाजप युवा मोर्चा (नवागत कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस – अजितदादा पवार गट)

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!