नांदेडराजकीय

Smart meters : देगलूर तालुक्यात स्मार्ट मीटर बसवू नयेत – शिवसेनेची मागणी

देगलूर| देगलूर शहरात गेल्या काही महिन्यांपासून वीज बिलाच्या तक्रारी वाढल्या असून, दुरुस्तीच्या नावाखाली महावितरणकडून स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्यावतीने आंदोलन छेडण्यात आले.

शहरातील नागरिकांनी चार महिन्यांपूर्वी महावितरणकडे “मीटर जपिंग” व हजारो रुपयांचे बिल येत असल्याबाबत तक्रारी केल्या होत्या. मात्र त्यावर तोडगा न काढता, आता दुरुस्तीच्या नावाखाली स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. याला शिवसेनेने तीव्र विरोध दर्शविला.

शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महावितरणचे उपमुख्य कार्यकारी अभियंता श्री. चाटे यांना निवेदन देऊन “देगलूर शहर व तालुक्यात स्मार्ट मीटर बसवू देणार नाही. जर महावितरणने हट्ट धरला तर शिवसेनेतर्फे आमरण उपोषण, रास्ता रोको आणि मीटर फोडो आंदोलन उभारले जाईल,” असा इशारा दिला.

IMG 20250908 WA0048 Smart meters : देगलूर तालुक्यात स्मार्ट मीटर बसवू नयेत – शिवसेनेची मागणी

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील, शहरप्रमुख संजय जोशी, शहरप्रमुख रवी उल्लेवार, सोशल नेटवर्किंग तालुकाप्रमुख भागवत पाटील सोमूरकर, मषणाजी पैलावार, बाबुराव मिनकीकर, विनोद सोनकांबळे, संतोष कांबळे, नागेश गुडलावार यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते. 

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!