Question mark on contractor : खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची अचानक पाहणी ; रेल्वे स्थानक ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह

हिमायतनगर (अनिल मादसवार) हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर (MP Nagesh Patil Ashtikar’s surprise inspection) यांनी हिमायतनगर रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या अमृत भारत योजनेतील तब्बल 42 कोटी रुपयांच्या कामाची बुधवार दिनांक 01 ऑकटोबर रोजी अचानक भेट देऊन पाहणी केली. काही दिवसांपूर्वी स्थानकाच्या कामात थातूरमातूर व अंदाजपत्रकातील गंभीर अनियमितता होत असल्याचे वृत्त नांदेड न्यूज लाइव्हने प्रकाशित केले होते. त्याची दखल घेऊन खासदारांनी आज थेट पाहणी केली असता अनेक उणीवा उघड झाल्या.

Oplus_16908288

बुधवारी दुपारी 2.30 वाजता हिमायतनगर रेल्वे स्थानकाला भेट देऊन पाहणीत केली असता दोन वर्षांपूर्वी करण्यात आलेले सिमेंट काँक्रीट फोडून पुन्हा निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे. लोखंडी गजाळी व साहित्यात कमी दर्जा दिसून आला. कोरोना काळापासून सुरू असलेले शेडचे काम अद्याप अपूर्ण असून, इमारतींचे नूतनीकरण फक्त जुनी भिंत लपवून बाजूला आडोसा म्हणून नवीन भिंत बांधून रंगरंगोटीच्या स्वरूपात आणले जात आहे. अभियंता व सुपरवायझर यांना विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देता आली नसल्याने हि मुद्दे उघड झाले आहेत. अंदाजपत्रकाला बगल देऊन ठेकेदाराकडून निधी लाटण्याचा प्रकार होत असल्याची शंका उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.

oplus_0

तसेच नागरिकांनी सांगितले कि, पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी बोअर मारणे आवश्यक, पार्सल ऑफिस, सिनियर सिटीझन कन्सीशन (हाफ तिकीट) लॉक डाऊन पासून बंद करण्यात आले ते चालू करणे. जनरल सुलभ शौचालय, अलाऊन्सिंगमध्ये तफावत आणि कोणता डब्बा कुठे येते याची माहिती मिळत नाही. तसेच प्रवाश्याना हव्या त्या सुविधा मिळत नसल्याचे आणि पोलीस चौकी नसल्याने चोरीचे प्रमाण वाढले असल्याचे नागरिकांनी सांगितले.

खासदारांचे आश्वासन
नागरिकांच्या तक्रारी व समस्या ऐकल्यानन्तर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी सांगितले की, ते लवकरच नांदेड डिव्हिजनच्या विभागीय व्यवस्थापकांशी चर्चा करून या कामाची सविस्तर माहिती घेणार आहेत. तसेच अंदाजपत्रकाप्रमाणे गुणवत्तापूर्ण व सर्व सोयीसुविधायुक्त काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी प्रवासी नागरिकांना आश्वासन दिले.

नागरिक व कार्यकर्त्यांची नाराजी

Oplus_16908288

पाहणीदरम्यान नागरिकांनी स्थानकावरील कामाबाबत तक्रारी केल्या. “जुन्या इमारतीला फक्त रंगरंगोटी करून नूतनीकरण दाखवून निधी गिळंकृत केला जातोय का?” असा सवालही उपस्थित झाला. काम अजूनही अर्धवट असताना डिसेंबर मध्ये स्थानकांचे उदघाटन करण्याच्या बेतात असल्याची चर्चा आहे. यावेळी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रवासी नागरिक, स्टेशन मास्तर, ठेकेदाराचे सुपरवायझर-इंजिनिअर व पत्रकार उपस्थित होते. खासदारांच्या भेटीनंतर कामाच्या गुणवत्तेत सुधारणा होऊन हिमायतनगर रेल्वे स्थानकाचे काम लवकर पूर्ण होईल, अशी अपेक्षा नागरिकांत व्यक्त होत आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button