Homeनांदेडसेवानिवृत सहायक पोलीस उपनिरीक्षक केंद्रे यांची सेवापूर्ती वाजतगाजत मिरवणूक -निरोप समारोप -...

सेवानिवृत सहायक पोलीस उपनिरीक्षक केंद्रे यांची सेवापूर्ती वाजतगाजत मिरवणूक -निरोप समारोप – NNL

लोहा| पोलीस आपल्या सेवा काळात एकीकडे वरिष्ठ…. …..अधिकारी ..दुसरीकडे पब्लिक याच्या कचाट्यात असतात… पण हल्ली पोलीसींग बदलली…. पोलीस कर्मचारी.. अधिकारी.. एकमेकांच्या सुख-दुःखात.. आनंदात सहभागी होत आहेत. तसे आश्वासक दृश्य लोहा पोलीस ठाण्यात दिसून आले पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी आपले सह‌कारी सहायक पोलिस उपनिरिक्षक अशोक केंद्र हे ३३ वर्षाच्या सेवेनंतर निवृत’ झाल्यानंतर त्यांचा सपत्नीक सत्कार करत वाजत गाजत त्यांची, उघड्या जीप मधून फुलांची उधळण करत घरापर्यंत मिरवणूक काढली ..पोलिस वाहनांच्या “सायरन “ची सलामी देत अविस्मरणीय सेवापूर्ती गौरव सोहळा सहकारी पोलिसांनी साजरा केला.

पोलीस फक्त संरक्षणासाठीच असतात ड्यूटीत कसूर झाली की… केली C3 लगेच त्यांच्या विरुद्ध वातावरण केले जाते. (हल्ली सोशल मीडियावर पोस्ट केली जाते ) पण खाकी’त ‘माणूस दडलेला असतो. याची समाजाला जाणीवच राहत नाही… त्यांच्या भावनाही जपल्या जात नाही. पोलीस यंत्रणा ही नेहमीच ‘जनतेच्या रोषाचे धनी असतात. पण काही अधिकारी हे आपल्या कर्मचान्यांचे काळजी घेणारे असतात. आता अशीच पोलिसिंग अधिक निष्ठेने’ ड्युटी करताना दिसाहेत लोह‌याचे जावई व सहा-सात वर्षा पासून कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक अशोक केंद्रे हे ३० जून रोजी सेवानिवृत झाले.

IMG 20240703 140008 सेवानिवृत सहायक पोलीस उपनिरीक्षक केंद्रे यांची सेवापूर्ती वाजतगाजत मिरवणूक -निरोप समारोप - NNL

त्यांचा स्वभाव सहकार्य वृतीचा प्रेमळ व मदतीचा होता. दाजी’ या नावाने ने परिचित होते. जून्या शहरातील मुंडे परिवार त्यांची सासुरवाडी त्यामूळे छोटी-मोठी वाद- भांडणे मग ती कोणत्याही समुहाची असो अशोक मुंडे यांच्याकडेच लोक हक्काने जात असत. पोलीस निरिक्षक श्री चिंचोळकर हे कर्तव्य कठोर पण आपल्या स्टॉप बाबत हळवे व सह‌कार्य करणारे अधिकारी म्हणून परिचित आहेत. अशोक केंद्रे सेवानिवृत झाल्या नंतर त्यांचा पोलीस ठाण्यात सपत्नीक सत्कार केला.

फुलांनी सजविलेल्या उघड्या जीप मधून वाजत गाजत मुख्य रस्त्याने पोलीस गाडी समोर’ सायरन वाजवत ‘एएसआय अशोक केंद्रे यांची फुलांची उधळण करत त्यांच्या घरा पर्यंत मिखणूक काढली घरी नेले. हा सन्मान कर्मचाऱ्यांच्या जीवनात अविस्मरणीयच. पोलीस द‌लात असे फार क्वचित घडते. सेवा करून ही शेवटी कौतुक होत नाही यांची खंत पोलीस दलातील कर्मचारी- अधिकारी यांना असते. पण एएसआय अशोक केंद्रे भाग्यवान ठरले. . पीआय चिचोलकरांनी त्यांचा सेवापूर्वी गौरव सोहळा’ साजरा केला तो निश्चितच पोलीस दलात एक प्रेरणादायी होय.. अशोक केंद्र व त्यांच्या पत्नी या आदरतिथ्याने भारावून गेल्या त्याचे डोळे पाणावले …असे क्वचित कर्मचाऱ्यांच्या नशिबी येते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments