Himayatnagar : केबल चोरी थांबेना; हिमायतनगर तालुक्यात पोलिस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह
हिमायतनगर, अनिल मादसवार | हिमायतनगर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या शेतातील मोटर केबल चोरी करणाऱ्या टोळीचा धुमाकूळ सुरूच असून, आतापर्यंत पाच ते सहा गावांमध्ये अशा घटना घडल्या आहेत. या चोरीच्या घटनांमुळे शेकडो शेतकरी थेट बाधित झाले असून, शेतीची महत्त्वाची कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत.
बाधित शेतकऱ्यांनी वारंवार पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या असल्या तरी अद्यापही चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे चोरट्यांचे मनोबल वाढत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.
मंगळवारी रात्री हिमायतनगर तालुक्यातील सवना परिसरात अज्ञात चोरट्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील मोटर केबल चोरून नेल्याची घटना घडली. या घटनेत ओमकार अनगूलवार, पोष्टी अनगुलवार, वसंतराव बिरकलवार, संदीप बिरकलवार, संतोष अनगुलवार, अशोक अनगुलवार, अशोक शिंदे, विलास बिरकलवार, तिरमक बिरकलवार, दिगांबर ...

