Pawar family ; वाढदिवसावरील खर्च टाळून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप ;पवार कुटुंबियांचा उपक्रम

लोहा l जिजामाता ग्रामीण शिक्षण संस्था , लोहाचे अध्यक्ष वसंतराव पवार यांनी नातवंडांचा वाढदिवस साजरा करताना अनाठायीं खर्चाला फाटा दिला व संस्थेअंतर्गत .शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले व नातू श्लोक श्रीकांत पाटील यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांत साजरा केला
काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष व जिजामाता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वसंतराव पवार यांचा नातू श्लोक श्रीकांत पवार यांना वाढदिवस साजरा करताना यावर्षीही अनाठायी खर्चाला फाटा
दिला.


संस्थेचे कोषाध्यक्ष श्रीकांत पवार व संचालिका सईताई पवार या दाम्पत्यांनी मुलांचा वाढदिवस साजरा करताना त्यांनी सामाजिक दायित्व स्वीकारून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याचा निर्णय घेतला
शिवछत्रपती प्राथमिक व माध्यमिक शाळा लोहा डॉ याकूबखान उर्दू प्राथमिक शाळा लोहा, वि ग पवार इंग्लिश स्कुल या शाळेतील विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष वसंतराव पवार यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले.


शाळेचे मुख्याध्यापक दामोधर वडजे, मुख्याध्यापक एच जी पवार, गजानन चव्हाण, प्रा.काचगुंडे, प्रा इंगोले,बी एन गवाले डी एम काहलेकर , आर आर पिठ्ठलवाड, एस एच शेख , व्ही।एस गुद्धे हरिहर धुतमल, एस आर शेटे श्रीमती आढाव, श्रीमती मीना पवार, विठ्ठल वडजे, यासह कर्मचारी विद्यार्थी याच्या उपस्थितीत अभिष्टचिंतन साजरा करण्यात आला मुख्याध्यापक वडजे , मुख्याध्यापक पवार यांनी शुभेच्छा दिल्या.तर अतिशय हसत खेळत बालाजी गवाले यांनी संचलन करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या





