Patanjali Yoga celebrates : राज्य प्रभाऱ्यांच्या उपस्थितीत नांदेड नगरीत पतंजली योग तर्फे जागतिक योग दिवस संपन्न

नांदेड| देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी व परम पूज्य योगऋषी स्वामी रामदेवजी महाराज यांच्या भगीरथ प्रयत्नाने जागतिक योग्य दिनाचे औचीत्त्य साधून 200 च्या वर देशात अकरावा जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला.

घरा-घरातील प्रत्येक व्यक्तीने योग केले पाहिजे व स्वतःला निरोगी ठेवले पाहिजे या संकल्पनेला साकार करण्याच्या उद्देशाने पतंजली योगपीठ परिवार नांदेड तर्फे श्री गुरुग्रंथ साहिबजी भवन यात्री निवास जवळ नांदेड ठिकाणी जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला.

याप्रसंगी भारत स्वाभिमान चे राज्य प्रभारी दिनेशजी राठोड, युवा भारतचे राज्य प्रभारी, शंकरजी नागापूरे उपस्थित होते तसेच राज्य कार्यकारणी सदस्य व जिल्ह्याचे पालकत्व असलेले पंढरीनाथजी कंठेवाड उपस्थित होते. या जागतिक योग दिवसासाठी मुख्य प्रशिक्षक सुरेशजी लंगडापुरे व भारत स्वाभिमान ट्रस्टचे जिल्हा प्रभारी रामजी शिवपनोर यांनी प्रोटोकॉल नुसार सर्वसाधारकांना प्रशिक्षण दिले.

या जागतिक योग दिवसाच्या प्रसंगी श्रीकृष्ण मंदिर काबरा नगरचे, वरद गणेश मंदिर गुजराती कॉलनीचे, हनुमान मंदिर बजाज नगरचाचे, दत्त मंदिर लोक मित्र नगरचे, हनुमान मंदिर शहाजी नगरचे, बालाजी मंदिर पारस नगरचे, हनुमान मंदिर गोरक्षणचे, नगरपालिका शाळा विष्णुनगरचे, जि. प.नियोजन भवन योग वर्गाचे, नारायण पाटील नगरचे, जवाहर बाबा नगर जवळचे, श्रीकृष्ण कोचिंग क्लास जवळचे, अनिल लॉन्स सम्राट हॉटेल जवळचे, ऑनलाईन वर्गातले मंडळी, हनुमान मंदिर दिपनगरचे, हनुमान मंदिर अशोक नगरचे, डीएड कॉलेज श्रीनगरचे, हनुमान मंदिर गीता नगर, एमजीएम कॉलेज गेटसमोर योग वर्गाचे, हनुमान मंदिर फरांदे पार्कचे, शिव हनुमान मंदिर अंबेकर नगरचे,

संध्या छाया वृद्धाश्रमचे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर ठिकाणचे, बालाजी मंदिर आनंद सागर सोसायटीचे, महावीर सोसायटीतील योग वर्गाचे, शितला माता मंदिर दधिची नगरचे, जिल्हा परिषद कॉलनीचे, गणपती मंदिर अष्टविनायकचे, परिमल नगर पावडेवाडी नाकाचे, श्री बालाजी मंदिर पारस नगरचे असे शेकडो योगशिक्षक,सह- योगशिक्षक, हजारो महिला-पुरुष योग साधक, हजारो नागरिक, तसेच नांदेड शहरातील प्रतिष्ठित राजकीय मंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते , व्यापारी, हजारो विद्यार्थी, शिक्षक आदि मान्यवर उपस्थित होते असे पतंजली योगपीठ परिवार नांदेड यांच्यातर्फे कळवण्यात आले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button