नांदेडमहाराष्ट्रव्हिडीओ

Malegaon mahayatra ; दक्षिण भारताच्या महायात्रेला नांदेड जिल्ह्यातील माळेगावात पारंपारिक उत्साहात सुरुवात -NNL

नांदेड। दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रेला आज प्रारंभ झाला. दुपारी श्री खंडोबाची देवस्वारी निघाली. ‘यळकोट यळकोट’ जय मल्हारच्या गजरात बेल भंडाराखोबऱ्याची उधळण करीत लाखो भाविकांनी देवस्वारीचे दर्शन घेतले. माळेगाव येथील श्री खंडोबाच्या यात्रेस पारंपारिक पद्धतीने सुरुवात झाल्यानंतर मुख्य रस्त्याने देवस्वारी निघाली. देवस्वारीचे विश्रामगृह येथे आगमन झाले होते 

WhatsApp Image 2024 12 29 at 5.02.32 PM 1 Malegaon mahayatra ; दक्षिण भारताच्या महायात्रेला नांदेड जिल्ह्यातील माळेगावात पारंपारिक उत्साहात सुरुवात -NNL

यावेळी पालखी दर्शनाला राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची उपस्थिती होती. त्यांच्या सोबत आमदार प्रतापराव पाटील चिखलीकरआमदार आनंदराव पाटील बोंढारकरजिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदेजिल्हा ग्रामीण प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकलेउपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य राजकुमार मुक्कावारउपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत मंजूषा कापसेजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगिता देशमुखप्राथमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगेग्रामीण पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता अमोल पाटीलउपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळअमित राठोडजिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. घुलेकृषी विकास अधिकारी सचिन कपालेकार्यकारी अभियंता अशोक भोजराजपंचायत समिती दशरथराव आडेराघोसरंपच प्रतिनिधी हनुमंत हुलगंडेग्रामपंचायत अधिकारी बी. सी. देवकांबळेग्रामपंचायतचे पदाधिकारी व हजारो भाविकांची उपस्थिती होती.

WhatsApp Image 2024 12 29 at 5.02.32 PM Malegaon mahayatra ; दक्षिण भारताच्या महायात्रेला नांदेड जिल्ह्यातील माळेगावात पारंपारिक उत्साहात सुरुवात -NNL

यावेळी पालखीचे मानकरी गणपतराव मल्हारराव नाईक (रिसनगाव)गोविंदराव नागेशराव महाजन (कुरुळा)व्यंकटराव मारोतीराव पांडागळे (शिराढोण)खुशालराव भगवानराव भोसीकर (पानभोसी) व गोविंदराव बाबाराव नाईकवाडे (पानभोसी)पांडुरंग नारायण पाटील (माळेगाव)मल्हारी रावसाहेब पाटील (माळेगाव)विजयकुमार शंकरराव कनकदंडे (आष्टुर) व अंबादास खंडेराव जहागीरदार (माळेगाव) यांचा देवस्थानच्यावतीने मानाचा फेटा बांधून गौरव करण्यात आला.

WhatsApp Image 2024 12 29 at 6.38.54 PM Malegaon mahayatra ; दक्षिण भारताच्या महायात्रेला नांदेड जिल्ह्यातील माळेगावात पारंपारिक उत्साहात सुरुवात -NNL

यावर्षी मंदिराकडे जाणारा रहदारीचा मुख्य रस्ता मोकळा केल्याने भाविकांना दर्शनासाठी सहज जाणे शक्य झाले. याचबरोबर यावर्षी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून अधिक सुरक्षितता घेतली जात आहे. तसेच प्लास्टिक मुक्त व कचरा मुक्त होण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेने उत्तम नियोजन केलेले आहे. तसेच पार्किंगसुरक्षा व्यवस्था याबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.

WhatsApp Image 2024 12 29 at 5.02.04 PM 1 Malegaon mahayatra ; दक्षिण भारताच्या महायात्रेला नांदेड जिल्ह्यातील माळेगावात पारंपारिक उत्साहात सुरुवात -NNL

यावेळी पालखी सोहळ्यात पारंपारिक वेशभूषा परिधान केलेले वाघ्या मुरळीवासुदेवपारंपारीक पध्दतीने कवड्याच्या माळीलांब हळदीचा मळवटहातापायावर चाबकाचे फटके मारत वाघ्या मुरळी सहभागी झाले होते. त्यांना पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. जिल्ह्यातील महत्त्वाच्या उत्सवात सहकार मंत्र्यांसोबतच जिल्हाधिकारी अभिजीत राऊत कुटुंबासह सहभागी झाले होते. या यात्रेसाठी नांदेड जिल्हा परिषदलोहा पंचायत समितीमाळेगाव ग्रामपंचायत मार्फत येणाऱ्या भाविकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे.

WhatsApp Image 2024 12 29 at 5.02.03 PM 1 Malegaon mahayatra ; दक्षिण भारताच्या महायात्रेला नांदेड जिल्ह्यातील माळेगावात पारंपारिक उत्साहात सुरुवात -NNL

आजपासून सुरू झालेली यात्रा  पुढे 5 तारखेपर्यत सुरू राहणार असून या यात्रेतील शासकीय कार्यक्रम राष्ट्रीय दुखवट्यामुळे पुढे ढकलण्यात आले आहे. दोन जानेवारीपासून कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. देशभरातील भाविक या ठिकाणी पुढील काळात येणार असून पशुधनाचा मोठा बाजार या ठिकाणी या कालावधीत सुरू होतो. तसेच पशुधन संदर्भातील आवश्यक वस्तू विक्रीचेही दुकाने मोठ्या प्रमाणात असतात. याशिवाय या यात्रेत देणाऱ्या भाविकांसाठी  2 जानेवारीला लावणी महोत्सव ही आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील अनेक सुप्रसिद्ध लावणी कलाकार व त्यांच्या अनेक चमू या ठिकाणी आपली कला साजरी करणार आहे.

WhatsApp Image 2024 12 29 at 5.02.04 PM Malegaon mahayatra ; दक्षिण भारताच्या महायात्रेला नांदेड जिल्ह्यातील माळेगावात पारंपारिक उत्साहात सुरुवात -NNL

या यात्रेला कुलदैवताची यात्रा समजणाऱ्या अनेक जमातीचे नागरिक आजपासून या ठिकाणी दाखल झाले आहे. आपल्या पारंपारिक पेहेरावात ते या ठिकाणी दाखल झाले आहेत. आजच्या यात्रेदरम्यान भारताच्या ग्रामीण भागातील अनेक कलांचे पालखी महोत्सव दरम्यान नागरिकांनी सादरीकरण केले.

FB IMG 1735489142668 Malegaon mahayatra ; दक्षिण भारताच्या महायात्रेला नांदेड जिल्ह्यातील माळेगावात पारंपारिक उत्साहात सुरुवात -NNL
FB IMG 1735489149830 Malegaon mahayatra ; दक्षिण भारताच्या महायात्रेला नांदेड जिल्ह्यातील माळेगावात पारंपारिक उत्साहात सुरुवात -NNL

या यात्रेदरम्यान पोलीस विभागाने चोखबंदोबस्त ठेवला असून मोठ्या प्रमाणात पोलीस दल या ठिकाणी कार्यरत आहे. नागरिकांनी कोणत्याही अपवादात्मक परिस्थितीमध्ये पोलिसांची मदत घ्यावीअसे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

उत्तम जागा पाहूनी मल्हाजरीदेव नांदे गड जेजुरीउत्तुम रायाची जेजुरी गडाला नऊ लाख पायरी या जयघोषात माळेगावच्यात यात्रेत पारंपारीक वाद्याने खंडेरायाची सेवा अर्पण करायला सुरुवात केली. पारंपारीक गितासोबत डफतुनतुने आणि जयघोषाच्या गजरात अवघा परिसर दुमदुमला. उर्वरित नियोजित कार्यक्रम 2 ते 5 जानेवारी पर्यंत होतील.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!