HomeनांदेडHimayatnagar Garbage problem : हिमायतनगर उमरखेड रोड व परमेश्वर मंदिर परिसरातील कचरा...

Himayatnagar Garbage problem : हिमायतनगर उमरखेड रोड व परमेश्वर मंदिर परिसरातील कचरा समस्येबाबत नागरिकांचा संताप

हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) शहरातील परमेश्वर मंदिर बसस्थानक परिसर आणि उमरखेड रोडवरील अमोल मेडिकल जवळ गेल्या आठ दिवसांपासून कचरा उचलण्यात आलेला नाही. तसेच या ठिकाणी कचरा कुंडीच उपलब्ध नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर कचरा साचून राहिला असून, प्रचंड दुर्गंधी पसरत आहे.

त्यामुळे मार्केट व बस स्थानक परिसर अक्षरशः कचरा डेपो सारखा झालेला असून, वारंवार तक्रारी करूनही नगरपंचायतीकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या घाणीमुळे डासांची उत्पत्ती वाढत असून, साथरोग पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.

IMG20250919064946 Himayatnagar Garbage problem : हिमायतनगर उमरखेड रोड व परमेश्वर मंदिर परिसरातील कचरा समस्येबाबत नागरिकांचा संताप
oplus_0

दररोज ग्रामीण भागातून येणारे नागरिक, शालेय विद्यार्थी, महिला तसेच दर्शनार्थी भक्त अमोल मेडिकल कॉर्नरच्या रस्त्याने आणि बसस्थानक परिसरातून ये-जा करतात. परंतु दुर्गंधीमुळे नागरिकांना तोंडाला रुमाल बांधून जाण्याची वेळ येत आहे.

ghan Himayatnagar Garbage problem : हिमायतनगर उमरखेड रोड व परमेश्वर मंदिर परिसरातील कचरा समस्येबाबत नागरिकांचा संताप

या दुर्गंधीयुक्त व घाणीच्या वातावरणामुळे हिमायतनगर शहराची बदनामी होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. म्हणूनच तातडीने कचरा उचलून त्या ठिकाणी कायमस्वरूपी कचरा कुंडीची व्यवस्था करण्यात यावी, आणि नियमितपणे घाण साफ करून सुरक्षित आरोग्याची हमी द्यावी अशी नागरिकांची मागणी आहे.

हिमायतनगर शहरातील मुख्य चौकात गेल्या आठ दिवसांपासून कचरा उचलण्यात आलेला नाही. कचरा कुंडी नसल्याने ढिगारे साचले असून, दुर्गंधी पसरली आहे. या घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून साथरोग पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. गावात जाणारा मुख्य रस्ता या कचऱ्यामुळे दूषित झाला असून गावाची इज्जत वेशीला टांगली जात आहे, अशी भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. ग्रामीण भागातून येणारे लोक शहरातील नागरिकांना “आमच्या खेड्यांवरही अशी परिस्थिती नाही, तुम्ही इथे कसे काय सहन करता?” अशी टीका करत आहेत. या समस्ये बाबत स्थानिक व्यापारी अमोल पेन्शनवार व इतर परिसरातील व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून तातडीने कचरा उचलण्याची मागणी केली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments