नांदेडलाइफस्टाइल

Nanded Godavari river floods : नांदेड गोदावरी नदीला महापुर मनपाच्या अगन्नीशामक दल ठरला देवदूत,जवळपास ५० जणांची केली सुटका -NNL

नांदेड| नांदेड येथील गोदावरी नदीला आलेल्या महापुरा नंतर मनपा हद्दीत असलेल्या नदीकाठच्या अनेक सखल भागात पाण्याने वेढा घातल्याने तात्काळ मनपा आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे यांच्या आदेशानुसार अगन्नीशामक दलाचे अधीकारी के.एल.दासरे यांच्या मार्गदर्शना खाली कमर्चारी यांनी बोटीच्या सहायाने खडकपुरा, गायत्री मंदीर, ऊर्वशि मंदीर व वसरणी भागातील जवळपास ५० नागरीकांची सुटका झाली.

तर खडकपुरा भागातील विधुत पुरवठा बंद झाल्याने महावितरण कमर्चारी यांना बोटीच्या सहाय्याने नेऊन विधुत पुरवठा सुरळीत करून भागातील नागरीकांना दिलासा दिला, तर बोटीच्या सहाय्याने बाहेर काढलेल्यानी देवदूत आला म्हणून संबधित पथकाला उपमा दिली तर गोदावरी नदीला आलेला पुर ४ सप्टेंबर रोजी ओसरल्याने पंपाच्या सहाय्याने गोवर्धन घाट येथील स्मशानभुमि चिखल मुक्त साफ सफाई अभियानाला सुरूवात केली आहे.

नांदेड येथील गोदावरी नदीला गेल्या तीन दिवसांपासून मोठया प्रमाणात विष्णुपूरी जलाशयातून पाण्याचा विसर्ग व संततधार पावसाने गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीत असलेल्या सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या वसरणी भागातील पंचवटी नगर, शंकर नगर भागातील पाण्याने वेढलेले असल्याने घरातील काही नागंरीक निवासस्थानी वर गच्चीवर असल्याचे समजल्याने २ सप्टेंबर रोजी नांदेड मनपाचे आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे,अतिरीकत आयुक्त गिरीश कदम,ऊपायुक्त अजितपाल संधु यांच्या आदेशा नुसार अगन्नीशामक दलाचे अधिकारी के.एल.दासरे, लिडींग फायरमन सुरेश कांबळे,फायरमन सुरेश कांबळे, संग्राम गिते,सय्यद बाबु, नागेश अंतेवार, मारोती कदम, एकनाथ पवळे, यांनी आपतकालीन परिस्थिती मध्ये बोटीच्या सहाय्याने तिन जणांना बाहेर काढले तर ३ सप्टेंबर रोजी खडकपुरा भागातून ३२, गायत्री मंदिर १६, ऊर्वशि मंदीर भागातील ५ अशा महिला, नागरीक, युवक यांना बोटीच्या सहाय्याने बाहेर काढले, यावेळी संबधित पथकाने देवदूत असल्याची प्रतिक्रिया यावेळी दिली.

458212709 506288022144875 2408748850923191046 n Nanded Godavari river floods : नांदेड गोदावरी नदीला महापुर मनपाच्या अगन्नीशामक दल ठरला देवदूत,जवळपास ५० जणांची केली सुटका -NNL

नांदेड शहरातील सखल भागातील खडकपुरा परिसरातील विधुत खांबे पाण्याखाली गेल्याने या भागातील वीजपुरवठा बंद झाल्यानंतर बोटीच्या सहाय्याने संबंधितांनी पथकाने विधुत कर्मचारी यांना नेवुन वीजपुरवठा सुरळीत केल्याने या भागातील अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला,तर शहरातील गोवर्धन घाट भागातील स्मशान भुमी पाण्याखाली गेल्याने दोन दिवसांपासून सिडको येथील स्मशान भुमित अंत्यसंस्कार करण्यात आले, ४ सप्टेंबर रोजी गोदावरी नदीला आलेला महापुर ओसरल्याने सकाळी दोन अगन्निन्शामक पंपाच्या सहाय्याने चिखल मुक्त साफसफाई अभियान राबविण्यात आल्याचे अधिकारी दासरे यांनी सांगितले,आपतकालीन परिस्थिती मध्ये हे केलेले कार्य सेवे मध्ये प्रेरणादायी असल्याचे ही म्हणाले, चौविस तास सर्तक राहुन विविध विभागातील माहिती व सखल भागाची पाहणी केली असल्याचे सांगितले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button