Shivanand Mingire : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजनांचा लाभ घ्या : शिवानंद मिनगीरे

नांदेड| विशेष सहाय्य विभागाच्या महत्त्वपूर्ण योजना मार्फत ज्येष्ठ नागरिकांना असाहय नागरिकांना, विधवा महिलांना केंद्र व राज्य शासनामार्फत मदत केली जाते. त्यामुळे या योजनांचा लाभ जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात घेतला गेला पाहिजे, असे आवाहन जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त सामाजिक न्याय विभाग शिवानंद मीनगिरे यांनी केले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाच्यावतीने श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, तसेच डीबीटी पोर्टल आदी योजनांच्या प्रचार प्रसिद्धीसाठी चित्ररथ सुरू करण्यात आला आहे.

यामध्ये जवळपास सर्व वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य दिल्या जाते. असाह्य गरीब कुटुंबातील 18 ते 65 वर्षाखालील पात्र लाभार्थ्यांना या सर्व योजनांमधून दीड हजारापर्यंत मदत केली जाते. या योजनांचा फायदा घ्यावा तसेच या योजनांचा लाभ आपल्या गावातील नागरिकांना मिळावा, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा,असे आवाहन त्यांनी केले. अधिक माहितीसाठी संबंधित तहसील कार्यालय अथवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button