नांदेडकरियर

Shivaji Vidyalaya ; शिवाजी विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश

नवीन नांदेड l जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी संचलित शिवाजी विद्यालय सिडको नांदेड शाळेने शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.विद्यालयाच्या १० विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश मिळवले.पुर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) मध्ये विद्यालयातील पाच विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले तर पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) विद्यालयाचे पाच विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.

पाचवीतील रुद्र अमोल पेन्शनवार, जोशी स्पृहा प्रसाद,तुपकरी लक्ष गजानन,शिरसे लक्ष्मण सुमेध‌ व मळगे वरद अशोक हे विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत तर इयत्ता आठवीतील पाच विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.यामध्ये लिंगसेकर मंदार मयूर,नरवाडे मिथिलेश,बागे गणेश राजू,पांडे प्रज्वल दिलीप व जाकोरे प्रशांत प्रकाश या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

शाळेच्या वतीने शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या सर्व पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार उपमुख्याध्यापक रवी शिवाजीराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रा.साहेबराव देवरे, पर्यवेक्षक विकास पाटील,मुख्य लिपीक वसंत वाघमारे ,गणेश जाधव,. एम.जी.स्वामी, आर.के.चंदनशिवे, पालक आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थिती होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!