धार्मिकनांदेडमुंबई

Swami Govind Devgiriji Maharaj : समाजाला अधर्माचा प्रतिकार करण्यासाठी तयार करावे लागेल ! – प.पू. स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज

फोंडागोवा (सच्चिदानंद परब्रह्म डॉआठवलेनगरी) – केवळ जप करत बसलोतर काम होणार नाहीभगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले होते, ‘माझे स्मरण कर पण युद्ध कर !’ स्वातंत्र्यानंतर ७० वर्षे आपल्या देशावर काळ्या इंग्रजांची सत्ता होतीआपला देश धर्मशाळा बनला आहेआता समाजाला अधर्माचा प्रतिकार करण्यासाठी तयार  करण्याची आवश्यकता आहेसनातन धर्माच्या आड येणार्‍या कायद्यांमध्ये पालट करून देशात कोणते कायदे हवेतयावर प्रयत्न करण्याची आवश्यकता आहेसनातन धर्माच्या प्रसाराचे कार्य ही साधनाईश्वराची उपासना आहेआपण आपल्या व्यक्तीत्वाची बाजी लावून आणि संघटित होऊन परमात्म्याच्या सेवेत स्वतःला अर्पण केले पाहिजेतर स्वर्णिम काळ दूर नाहीअसे मार्गदर्शन श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प.पूस्वामी गोविंद देवगिरीजी यांनी केलेया वेळी देशविदेशातील २० हजारांहून अधिक हिंदू उपस्थित होते.

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉजयंत आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहेमहोत्सवातील ‘सनातन राष्ट्र संकल्प’ सभेत ते बोलत होतेव्यासपीठावर सनातनचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉजयंत आठवलेउत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष श्रीसतीश महाना, ‘सनातन बोर्ड’चे प्रणेते पूदेवकीनंदन ठाकूरअखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत पूरवींद्र पुरी महाराजआचार्य महामंडलेश्वर अनंत श्री विभूषित श्री श्री १००८ स्वामी बालकानंद गिरीजी महाराजहिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळेसर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता अश्विनी उपाध्यायअयोध्या येथील सिद्धपीठ हनुमान गढी मंदिराचे महंत राजूदासजी महाराजइंडोनेशिया येथील धर्मस्थापनम् फाऊंडेशनचे पूधर्मयशजी महाराजस्वामी आनंद स्वरूप आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्रीदर्शक हाथी हे उपस्थित होतेया वेळी मान्यवरांमध्ये सनातन संस्थेच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचीही वंदनीय उपस्थिती होती.

.पूगोविंददेवगिरीजी महाराज पुढे म्हणाले, ‘‘सनातन संस्थेचे संपूर्ण कार्य आध्यात्मिकतेच्या पायावर उभे आहेभारत राष्ट्राला एक समजून काम करत आहेतभगवद्गीता युद्धाच्या भूमीवर सांगितलेला ग्रंथ आहेसनातन संस्थेनेही या ग्रंथाप्रमाणेच अध्यात्मापासून युद्धापर्यंत जागृती केली आहेमी या महोत्सवामध्ये युद्धकलांचे प्रदर्शन पाहिलेमला वाटते की देशातील सर्व संतांनी त्यांच्या शिष्यांना हे शिकवले पाहिजे.’’

सनातन संस्कृतीच्या रक्षणासाठी शक्तीची उपासना करा ! – सतीश महानाविधानसभा अध्यक्षउत्तरप्रदेश

सनातन संस्कृतीच्या रक्षणासाठी जागृती करणे आवश्यक आहेया जागृतीसाठी केवळ वाणी नव्हेतर साहस आणि शौर्य हेही आवश्यक आहेयासाठी प्रत्येक हिंदूने शक्तीची उपासना केली पाहिजेसनातन संस्कृतीने नेहमी सर्वांचे हितच चिंतिले आहेतथापि काही पंथांमध्ये ‘अन्य धर्मियांना मारा’ अशी शिकवण दिली जातेयाविषयी हिंदूंमध्ये जागृती होणे आवश्यक आहे.

लोकसंख्या नियंत्रण कायदा हाच अनेक समस्यांवर उत्तर ! – अधिवक्ता अश्विनी उपाध्याय

देशात अल्पसंख्याकांची संख्या प्रचंड वाढत असून हिंदूंची संख्या अल्प होत आहेअल्पसंख्याकांची संख्या कोट्यवधीमध्ये वाढत असतांना त्यांना अल्पसंख्याक कसे म्हणायचे अल्पसंख्यांकांमुळेच लव्ह जिहादलँड जिहादधर्मांतर यांसह अनेक समस्यांना हिंदू बळी पडत आहेत.  प्रतिदिन १० हजार लोकांचे धर्मांतर होत आहेतहवालाद्वारे पैशाचे फंडीग होत असल्याने धर्मांतर होत आहेघुसखोर सिंगापूरचीनअरब राष्ट्रात घुसखोरी न करता ते भारतातच का येतात कारण काँग्रेसने केलेल्या अनेक कायद्यांद्वारे त्यांना केवळ सुविधाच मिळतात असे नाहीतर कायदेशीर संरक्षणही मिळतेत्यामुळे लोकसंख्या नियंत्रण कायदा हाच अनेक समस्यांवर उत्तर आहे.

सनातन राष्ट्रा’साठी ‘धर्मदूत’ बनण्याचा संकल्प करूया ! – सद्गुरु चारुदत्त पिंगळे

भारताला ‘सनातन राष्ट्र’ बनवणेहा संतांचा संकल्प आहेहा संकल्प पूर्ण करण्यासाठी आपल्याला सर्वोत्कृष्ट योगदान द्यावे लागेलविभीषण रामनाम घेत होतातो श्रीरामाचा भक्त होतापण हनुमंताने सांगितले, ‘‘केवळ रामनाम घेतल्याने प्रभूंची कृपा होणार नाहीतर प्रभूंचे कार्य केलेतरच प्रभूंची कृपा होईल !’’ आपल्यालाही आज रामकाजाचाम्हणजे राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाचे कार्य करण्याचा संकल्प करावा लागेल. ‘सनातन राष्ट्रा’साठी ‘धर्मदूत’ बनण्याचा संकल्प करावा लागेल !

 धर्मासाठी हिंदूंना कट्टर व्हावेच लागेल – महंत श्री राजूदासजी महाराजअयोध्या

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवामध्ये हिंदुत्वाचा जागर होत आहेहिंदुत्व वाचलेतर राष्ट्र वाचेल आणि भारत टिकलातर विश्व वाचेलअन्य पंथ हे मौजमजेसाठी आहेतकेवळ सनातन धर्मामध्ये विश्वकल्याणाची भावना आहेयासाठीच सनातन धर्माचे रक्षण आवश्यक आहेसर्व संतांनी धर्मरक्षणासाठी भक्तांना जागृत करायला हवेधर्मासाठी हिंदूंना कट्टर व्हायलाच लागेल.

धर्मसत्ता आणि राजसत्ता यांच्या संयोगानेच सनातन राष्ट्राची स्थापना ! – स्वामी बालकानंद गिरीजी महाराज

शंकराचार्यांचे सैन्य असलेल्या आखाड्यांवर आजपर्यंत कोणीही कब्जा करू शकलेले नाहीआज आपल्या हृदयात जागृती आली पाहिजे कीधर्मसत्ता आणि राजसत्ता यांच्या संयोगानेच सनातन राष्ट्राची स्थापना होऊ शकते.

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवातून विश्वरूपाचे दर्शन मला झाले आहे ! – श्रीसुरेश चव्हाणके

वर्ष २००८ मध्ये भगवा आतंकवादसाध्वी प्रज्ञासिंह यांना अटक आणि त्यांच्यावर झालेले अत्याचार अशा प्रकारे हिंदु धर्माची अपर्कीती चालू असतांना मी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉआठवले यांची भेट घेऊन यावर चर्चा केली होतीत्या वेळी त्यांनी दिव्यदृष्टीने जी माहिती दिलीत्याची प्रचिती आजही मला येत आहेइतर अध्यात्मिक संघटना विज्ञानाच्या आधारे हिंदूंना मार्गदर्शन करतातमात्र सनातन संस्था ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचे ज्ञान देऊन धर्मकार्य करत आहेखर्‍या अर्थाने धर्म आणि अध्यात्म यांचा प्रचार करत आहेयासाठी शंखनाद महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहेया महोत्सवातून विश्वरूपाचे दर्शन मला होत आहे.

सनातन संस्थेच्या विचार प्रत्येक हिंदूच्या मनात येईलतेव्हा भारत हिंदु राष्ट्र होईल ! – स्वामी आनंद स्वरूप

साधूसंतांच्या आखाड्यांची शौर्यगाथा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्यगाथा प्रत्येकाला सांगितली पाहिजेमी सनातनच्या साधकांच्या चेहर्‍यावर तेज पहातो आणि प्रत्येक सनातनच्या साधकामध्ये प.पूडॉआठवले यांना पहातोसनातन संस्थेच्या विचार प्रत्येक हिंदूच्या मनात येईलतेव्हा भारत हिंदु राष्ट्र होईल.

पुढच्या पिढीला रामायण आणि गीतेच्या शिकवणीपासून वंचित ठेवू नका ! – पूधर्मयशजी महाराज

हिंदु धर्म हा हिरा आहेत्यामुळे त्याचे सतर्कतेने रक्षण करून धर्म पुढे वाढवायचा आहेआपली मुले सनातन धर्म पुढे घेऊन जाणार आहेतत्यामुळे मुलांना गीता आणि रामायण तर शिकवावेच लागेल. या कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी व थेट प्रक्षेपणासाठी भेट द्या – SanatanRashtraShankhnad.in

आपला नम्र, श्री. अभय वर्तक, प्रवक्ते, सनातन संस्था.(संपर्क :  ९९८७९२२२२२)

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!